पुगांव - खांब प्रतिनिधी ( नंदकुमार कळमकर )
गणेश भक्त ग्रामस्थांनी शनिवारी लाडक्या गणरायाला आणि त्यासोबत गौरींनाही दिला भावपूर्ण निरोप
सलग पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर खांब देवकान्हे विभागातीलखांब,पुगाव,वैजेनाथ,घेरासुर,मुठवली,शिरवली,गोवे,शिरवली,नडवली,तळवली,चिल्हे,धानकान्हे,बाहे,देवकान्हे,येथे गणेश भक्त ग्रामस्थांनी शनिवारी आपल्या लडक्या गणरायाला आणि त्यासोबत गौरींनाही भावपूर्ण निरोप दिला...शनिवारी जोरदार पाऊस त्यामुळे बाप्पांचे विसर्जन हे सायंकाळपर्यंत गणपती बाप्पांचे आणि गौरींचे विसर्जन मोठया उत्साही वातावरणात झाले... 'गणपती बाप्पा मोरया, 'पुढच्या वर्षी लवकर या'उंदीर मामा की जय च्या जयघोष करत पुगाव येथील लहान थोर मंडळींनी गणेश मूर्तीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले...
पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे व गौरींचे विसर्जन बाप्पांचा मनभावे जयघोष करत भक्तीभावाने निरोप
येथील गावातील नजिकच्या तलावात तसेच नदी पात्रात विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती...गणपती विसर्जन सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन दक्षता घेतली होती..क्कॉक्क तसेच विसर्जन घाट मार्गाची स्वच्छ्ता देखिल आधीपासूनच करण्यात आली होती...तर शनिवारी अकारा वाजता पावासाने जोरदर हजेरी लावत कोलाड खांब देवकान्हे परिसरात दमदार पाऊस पडला...या पावसातही ढोल-ताशांच्या गजरात, टाळ- मृदुंगांच्या सुरात आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने आणि जड अंतः करणाने निरोप दिला...
पूजा आरत्यांचे तसेच महिलांकडून गौरींचे गीत मंजूळ स्वरात गायन
एका मागून एक गणपती मूर्ती गणेश भक्त डोक्यावर घेत विसर्जन स्थळी जात होते...गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत थोडा वेळ पावसाची उघडदीप मिळताच विसर्जनस्थळी पोहचत पूजा आरत्यांचे तसेच महिलांकडून गौरींचे गीत मंजूळ स्वरात गायन करत येथे पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे व गौरींचे विसर्जन बाप्पांचा मनभावे जयघोष करत भक्तीभावाने निरोप दिला...
