महाराष्ट्र वेदभुमी

खांब पालदाड मुख्यमंत्री सडक योजना अर्धवट अवस्थेत याला जबाबदार कोण, सर्वत्र एकच संताप.एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत.


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)

रायगड रोहा तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला खांब पालदाड  मार्गाची अवस्था अगदी बिकट...

गेली अनेक वर्षे या रखडलेल्या सडकेला जबाबदार कोण हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे...तर एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत सदरच्या मार्गाची झाली आहे गेली अनेक वर्षे या मार्गाच्याच दुरस्तीकडे बांधकाम खाते की संबधित लोकनेते दुर्लक्षित आहेत हेच काही कळत नाही... तर या मार्गाची मुख्यमंत्री सडक योजना गेली अंतर्गत खांब देवकान्हे पालदाड मार्गाचे केलेले काम गेली अनेक वर्षे रखडले आहे त्यात सडकेचा कामच अर्धवट साऱ्या जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते ना रस्ते सुधारले गेले माञ ही सडक का रखडली गेली आहे याचे कारणही गुलदस्त्याच आहे...हा मार्ग केवळ तालुक्यात नाही जिल्ह्यातही नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात या सडकेची अथवा पालदाड पुलाची ओळख आहे हे नाकारता येणार नाही...कारण या रस्ता मार्गासाठी येथील नागरिकांनी अनेदा संघर्ष केला त्याची समस्या कोणत्याच सरकारला सुटत नाही... हे दुर्दैव पडलेले मोठ मोठे खड्डे खड्डेमय प्रवास मार्गालगत वाढलेली काटेरी झुडपे त्यामुळे प्रवास तर धोकादायकच मात्र वाहांन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत...

काटेरी झुडपात तर धानकान्हे देवकान्हे दरम्यातील व उडदवने पालदाड पुलाकडे जाणारा मार्ग खड्डयात

भयानक वाढलेल्या काटेरी झाडी झुडपांमुळे पुढील वाहनेच दिसत नाहीत... तर अरुंद मार्गाच्या रस्त्यामुळे समोरासमोर वाहने आली की कोणतीतरी एका वाहन चालकांना मागे रिव्हर्स करणे बंधनकरक खांब नडवली तळवली मार्ग हरपले आहे... काटेरी झुडपात तर धानकान्हे देवकान्हे दरम्यातील व उडदवने पालदाड पुलाकडे जाणारा मार्ग खड्यांत त्यात अरुंद मार्ग असल्याने धानकान्हे देवकान्हे व उडदवने पालदाड हा अरुंद मार्ग तसेच खड्डेमय मार्ग असल्याने धोकायक तसेच वाहन चालक यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे...मागील काही वर्षांपूर्वी थातुरमातुर दुरुस्ती केली तर उदडवणे पालदाड रस्त्यावर पुन्हा जैसे थे तसेच अर्धवट काटेरी झुडपे या मार्गावरील काढण्यात आली...तर या मार्गावरील काटेरी झुडपे न काढल्याने वळणावर होत आहेत...आपघात याला जबाबदार कोण ? असा सवाल येथील ग्रामस्थ नागरिक करत आहेत या मार्गावरील अर्धवट काढलेली काटेरी झुडपे आता प्रवाशी नागरिकांच्या जीवावर बेतली आहेत... त्यात अरुंद रस्ता धोकादायक वळणं व भयानक वाढलेली काटेरी झुडपे यामुळे समोरील येत असलेले वाहनं दिसत नसल्याने दररोज आपघात होत आहेत...

खांब देवकान्हे तसेच उडदवने पालदाड मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत

मागील सहा सात वर्षांपूर्वी खांब निडीतर्फे अष्टमी या मार्गाचे काम मुखमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आले परंतु ते काम निडी ते देवकान्हे या दरम्यान केले गेले देवकान्हे खांब हे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील काम हे अद्याप रखडलेले आहे... त्यामुळे हा मार्ग सध्या धोकादायक बनला आहे  रायगडात अनेक ठीक ठिकाणची रस्त्यांची कामे विविध योजनेंतर्गत केली जातात मात्र एक खांब देवकान्हे तसेच उडदवने पालदाड मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे... मागील वीस ते पंचवीस वर्षाचा आढावा घेतला तर एकही वर्ष असा गेला नाही की मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील मंत्री नाही तरी देखील विकासापासून हा भाग वंचीत राहिल्याचे समोर येत आहे...त्यामुळे या मार्गाच्या अर्धवट  असलेल्या कामाला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे...

रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी  प्रवासी वर्गातून मागणी

रस्त्याची दुरुस्ती कधी होतच नाही माञ दुरुस्तीचे आश्वासन कायम तर काही ठिकाणी खड्डे न भरता आणतात आव याला करायचे काय त्यामुळे त्यामुळे येथील नागरिकांची खड्डेमय रस्त्याची घरघर कायम तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे..


Post a Comment

Previous Post Next Post