चणेरा प्रतिनिधी (सत्यपसाद आडाव)
रोहा येथे भाजपा रोहाच्या वतीने गणेशउत्सवात २ लाख रु अपघाती व अपंगत्व विमा वआभा हेल्थ कार्ड शिबीर आयोजन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन २४ सप्टेंबर २०२३ रोजी रविवारी, शासकीय विश्रामगृह रोहा येथे भारतीय जनता पार्टी रोहाच्या वतीने गणेशउत्सवात २ लाख रुपयाचा अपघाती व अपंगत्व विमा तसेच आभा हेल्थ कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे...सदर शिबिरात रिक्षा चालक, महिला बचत गट, घरकाम करणारे महिला, कामगार वर्गासहित सर्वजण लाभ घेऊ शकतात... प्रधानमंत्री सुरक्षा विमामध्ये २ लाख रुपयांचा अपघाती व अपंगत्व विमा काढण्यासाठी पासबुक प्रत, आधारकार्ड प्रत, जन्मवारसा नाव ही माहिती लागेल...
सेवा पंधरवडाच्या माध्यमातुन या कार्यक्रमाला विशेष महत्व
तसेच आभा हेल्थ कार्ड शिबीर आधारकार्ड / पॅनकार्ड हे कागदपत्रे लागतील... सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ घेऊ शकतात... सेवा पंधरवडाच्या माध्यमातुन या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे... या शिबिरासाठी अमित घाग मा. जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड भाजपा युवा मोर्चा , रईस कादरी जिल्हाध्यक्ष-दक्षिण रायगड अल्पसंख्यक मोर्चा , हाजी कोठारी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार रायगड जिल्हा सचिव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे असे रोशन चाफेकर श्रीवर्धन विधानसभा सहसंयोजक-सेवा पंधरवडा समिती यांनी सांगितले...
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भेट कार्यक्रमास शुभेच्छा व पत्रिकाचे अनावरण
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली असता त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रम पत्रिकाचे अनावरण केले... या प्रसंगी भाजपचे अमितजी घाग, रोशन चाफेकर यांच्यासहित युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, युवा कार्यकर्ते अनिल घरजाळे, सुमित जंगम सुद्धा उपस्थित होते...

