रोहा दि. २२ सप्टें. विशेष प्रतिनिधी
वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका व सुरक्षा रक्षकांनी केली जिल्हा शल्य चिकित्स्क अलिबाग यांच्या कडे लेखी तक्रार
रोहा उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच मिळालेलं नाही, लिपिकाने येथिल डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक अहवाल तयार करून मुख्य कार्यालयात सादर न केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी, अधि परिचारिका व सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना अद्याप पगारच मिळालेला नाही... ऐन सणासुदीत पगार न मिळाल्याने वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका व सुरक्षा रक्षकांनी संताप व्यक्त करीत असून दोषी लिपिकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे...याबाबत जिल्हा शल्य चिकित्स्क अलिबाग यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे...
ऑन ड्युटी मद्यपान करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाच्या बेजबाबदारपणाचा फटका
रोहा उपजिल्हा रुग्णालयात अंकुश वाघोळे हे वरिष्ठ लिपिक पदावर काम करीत असून ते सतत मद्यपान करून कामावर येतात, त्यामुळे त्यांना शुद्ध राहत नाही...शुद्ध हरपलेल्यामुळे त्यांनी ४ महिने येथिल कर्मचाऱ्यांचे पगार पत्रकच तयार केलेले नाहीत... परिणामी रोहा उप जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वर्ग -२, अधिपरिचारिका वर्ग-३, सुरक्षा रक्षक वर्ग-४ यांना माहे मे ते ऑगस्ट पर्यंतचे वेतन मिळालेले नाही... डॉक्टर, पारिचारिका व सुरक्षा रक्षक यांचा ४ महिने वेळेवर पगार न झाल्यामुळे ऐन सणासुदीत त्यांना अंनत अडचणींचा सामना करावा लागत आहे...सेवेत रुजू असलेल्या पर तालुक्यातील काही जणांचे तर रूम भाडे देखील थकलेले आहे...लिपिक वाघोळे यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे 'अंकु्श' नसल्यामुळे ते इतर वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांना रोजच त्यांच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे येथिल वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे...या मद्यपी वरिष्ठ लिपिकाच्या मनमानी कारभाराबद्दल येथील ४ वैद्यकीय अधिकारी,१० पारिचारिका व ३ सुरक्षा रक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्स्क अलिबाग व उप अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय यांच्या कडे वरिष्ठ लिपिक अंकुश वाघोळे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे...
प्रतिक्रिया
आपण स्वतः प्रत्यक्ष रोहयात येऊन याविषयी सर्व चौकशी केली आहे, सदर लिपिकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच तात्पुरते स्वरूपात तेथे सहाय्यक अधिक्षक राहिरे यांची नेमणूक देखिल केली आहे, त्यांनी सर्व प्रलंबित कामे करून घेतली, परंतु ट्रेझरी मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने ते प्रलंबित राहिले आहे. लवकरच तेथिल सर्व कामकाज सुरळीत होईल.- नितिन देवमाने, जिल्हा शल्य चिकित्सक अलिबाग
वैद्यकीय क्षेत्रात अशा विसंगती निर्माण होणे फार चुकीचे आहे, उपजिल्हा रुग्णालयात एकतर योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड आहे, दुसरीकडे वरिष्ठ लिपिक असे बेजबाबदारपणे वागत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, सिटीझन फोरम याविषयात लक्ष घालून त्याचा पाठपुरावाही घेईल.- नितिन परब, अध्यक्ष- रोहा सिटीझन फोरम
