महाराष्ट्र वेदभुमी

पंचायत समिती रोहा शेष फंडाअंतर्गत कामातील भ्रष्टाचाराविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा...



  शहनवाज मुकादम प्रतिनिधी रोहा

शेषफंडाच्या निधी वाटपात झालेल्या अनियमता व भ्रष्टाचार उघड करुन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करूनदेखील कारवाई नाही..

तालुका पंचायतीच्या शेषफंडाच्या निधी वाटपात झालेल्या अनियमता व भ्रष्टाचार उघड करुन देखील फौजदारीस पात्र असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करुन सुद्धा कारवाई होतांना दिसत नाही....सन २०२१ ते आजपर्यंत केलेल्या तक्रारीच्या पाठपुरावा पहाता रोहा पंचायत समिती शेषफंडातून एकाच कामासाठी डब्बल रक्कम घेतल्याची माहिती अधिकार अर्जातून उघड झाली आहे..

अधिकारी कामात स्पष्ट दिशाभूल करीत असल्याचे कागदोपत्री उघड होतांना दिसत आहे...अशांवर वरीष्ठांनी कारवाई करावी...

हा शेषफंड रक्कम ८०,हजार रुपये दोन ठिकाणी काम दाखवून अधिकारी कामात स्पष्ट दिशाभूल करीत असल्याचे कागदोपत्री उघड होतांना दिसत आहे...हे काम एकदा खैरे खुर्द कब्रस्तान येथे मुरुम टाकण्याचे खर्च दाखवीत आहे...तर नंतर बिरवाडी ते खैरे खुर्द कब्रस्तानपर्यंत मुरुम टाकण्यात आले असल्याचे दाखवत आहे...असे असताना ग्रामपंचायतीच्या रेकाॅटला मात्र माहिती अधिकारात माहिती घेतली असता हे काम झालेच नाही.. अशा निकषाची माहिती उपलब्ध झाली आहे...यावरुन संबंधित अधिकारी, ठेकेदाराकडून व या निधीचा वापर ज्यांच्या ज्यांच्या संगमताने झाला आहे अशांवर वरीष्ठांनी कारवाई करावी...गेले दोन वर्षे करत असलेल्या मागणीला तीळांजळी देण्याचे गौडबंगाल अधिकारी वर्गातून होतांना दिसत असल्याने मा.पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग यांच्याकडे केलेला तक्रार अर्ज रोहा पोलीस स्टेशन येथे चौकशीला आला असून सदर अर्जाचा तपास पोलीस हवालदार श्री गदमळे यांच्याकडे असून शासनाच्या निधीचा उपहार होऊन चोरी केल्याचे उघड झाल्याने राज्य कारभार नियमावली नुसार फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.सदरच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पंचायत समिती रोहा   पोलीसांकडून दोन वेळेस पाठविण्यात आले असता पंचायत समिती रोहा व राजिप अलिबाग यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही...

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिजीत बडे साहेब यांनी मा.आयुक्त कोकण विभाग यांच्याकडील सदर विषयातील पत्राची घेतली दखल...

 सदरच्या विषयाबाबत कारवाई होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी रायगड व मा.आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असता  रायागडच्या मा.उप जिल्हाधिकारी  बैनाडे मॅडम यांनी कर्जत येथील अन्य तक्रारदाराच्या पत्रावर क्लासवन अधिकाऱ्यांकडून सही करून दिशाभुल करण्याचाही प्रकार समोर आला आहे...मात्र राजिप अलिबागचे (अतिरिक्त) मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिजीत बडे साहेब यांनी मा.आयुक्त कोकण विभाग यांच्याकडील सदर विषयातील पत्राची दखल घेतली...तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होणेबाबत केलेल्या तक्रारीची सुनावणी दि:१५/०५/२३, रोजी आयोजित केली असून सदरच्या सुनावणीत तक्रारदार म्हणून आपली बाजु लेखी व तोंडी मांडण्यात आली असुन सदर कामाची रक्कम ठेकेदारास मिळाली असल्याचा नमुना १२ नंबरच्या फॉर्मवरील लिखावट व स्वाक्षरी एकाच व्यक्तीची असून सदर विषयाची माहिती जाणून बुजून देण्यास टाळाटळ होत आहे..

भ्रष्टाचाराविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या कार्यालया समोर उपोषण... 

संबंधित ग्रामसेवक,अभियंता व  विस्तार अधिकाऱ्यांकडून तोंडी बाजु मांडण्यात आली आहे...तसेच ग्रामपंचायत खांबेरेचे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य व राजिप चे सेवानिवृत्त अभियंता श्री बारदस्कर यांना नोटीस पाठवून सदर विषयाची सखोल चौकशी करुन कागदोपत्रानुसार निर्णय देण्यात येणार.असल्याचे श्री अभिजीत बडे साहेब यांनी सदर सुनावणीत समाधानकारक उत्तर दिले होते...परंतु सदरच्या सुनावणीला जवळपास तिन महिन्यांचा कालावधी होत असून आजतागायत राजिप कडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही...तरी पंचायत समिती रोहा शेष फंडाअंतर्गत कामातील संबंधित सरपंच ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून सदरचे काम शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करीत आहेत...त्यामुळे या भ्रष्टाचाराविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्यास मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post