महाराष्ट्र वेदभुमी

रोहा अंजुमन उर्दू हायस्कुलमध्ये जागतिक कांदळवन दिन साजरा



कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे 

विद्यार्थी वर्गात पर्यावरणाविषयी प्रेम व कांदळवन संदर्भात अधिक माहिती मिळावी म्हणुन हा दिवस केला जातो साजरा 

रोहा वनविभाग, अंजुमन उर्दू हायस्कुल व रोहा एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशन इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनियर कॉलेज ( सायन्स ) यांच्या संयुक्त विद्यामाने शहरातील अंजुमन ए इस्लाम जंजीरा उर्दू हायस्कुलमध्ये जागतिक कांदळवन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...

कांदळवन दिनाचे औचित्य साधून अंजुमन हायस्कूल अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

कांदळवन दिनाचे औचित्य साधून अंजुमन हायस्कुल अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला स्पर्धा व विविध स्पर्धा पार पाडण्यात आल्या...विद्यार्थी वर्गात पर्यावरण विषयी प्रेम व कांदळवन संदर्भात अधिकाधिक माहिती मिळावी म्हणुन हा दिवस साजरा करण्यात येतो... 

कांदळवन कक्षाचे मसूद मुखत्यार मनियार प्रकल्प सहयोगी यांनी विद्यार्थ्यांना दिली कांदळवन व समुद्री जैवविविधता यांच्या बद्दल माहिती

वन विभाग खात्यातील कांदळवन कक्षाचे मसूद मुखत्यार मनियार प्रकल्प सहयोगी यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन व समुद्री जैवविविधता यांच्या बद्दल माहिती दिली... नियोजित केलेल्या विविध स्पर्धेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता..या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले...अंजुमन हायस्कुलचे मुख्याध्यापक वसीम सातारेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाची अशी  साथ दिली...

Post a Comment

Previous Post Next Post