महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्गावर दुचाकीस्वारचा अपघात...गंभिर जखमी...खड्ड्यातून दुचाकी उडाली डिवायडरवर...

 


श्याम लोखंडे प्रतिनिधी कोलाड 

महामार्गावर पडलेल्या खड्डे प्रवाशांची मोठी डोकेदुखी

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड खांब  जवळील पुगाव येथे महामार्गावर पडलेल्या भयानक खड्यात बुधवारी रात्री आठच्या सुमारास एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला.आहे... यात दुचाकी स्वार गंभिर जखमी झाला असून दुचाकीचे खूप मोठे नुकसान झाल्याचे समजले आहे...मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली तेरा वर्ष रखडले आहे... तर मागिल मे महीन्यात इंदापूर ते वडखळ या मार्गावर करोडो रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले... तर गेली पंधरा दिवस पडलेल्या पावसामुळे याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे... 

खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशाच्या जिवालाही धोका....प्रवाशांच्या जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का?..

रात्रीच्या सुमारास कोलाड कडून नागोठणेकडे प्रवास करणार्या एका दुचाकीस्वाराची दुचाकी सदरील खड्यात आपटली असून दुचाकी डिवायडरवर फेकली गेल्याने अपघात झाला आहे...ही घटना अत्यंत चिंताजनक आहे... वाहनचालकांसह प्रवाशाच्या जिवाला या खड्ड्यांमुळे आता धोका निर्माण झाला असुन सदरील खड्ड्यात कोणी प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का?अशी प्रवाशांना आता भीती निर्माण झाली आहे...

सामाजिक कार्यकर्ते अलंकार खांडेकर खांब यांनी दिली प्रतिक्रिया 

गेली तेरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे... याची आता सर्व सामान्य माणसांनी तसेच कोकण वासियानी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे... तर कोरोडो रुपये खर्च करून देखील महामार्गाची ही गंभिर समस्या आहे...इंदापूर ते पलस्पे मार्ग हा अत्यंत धोकादायक बनला आहे... त्यामुळे प्रवास करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे.. मोठमोठया  खड्ड्यांमुळे अनेक वाहने अडकून बंद पडल्याने हे अपघात होत आहेत... मागील काही दिवसांपूर्वी कोलाड पुई नजिक महीसदर नदीपात्र पुलावर खूप मोठा खड्डा पडला होता... तिथे देखीलअपघात घडला होता... त्याची दखल रोहा तहसीलदार यांनी घेत तबडतोब तो खड्डा बुजविण्याचे आदेश दिले... त्यानंतर खड्डा भरला गेला... परंतु कोलाड खांब दरम्यान याच खड्ड्यांमुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे... त्यामुळे पुगाव नजिक पडलेला खड्डा तसेच सदरचे खड्डे हे अपघात रोखण्यासाठी बुजविण्यात यावे...अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे...अशी प्रतिक्रिया अलंकार खांडेकर सामाजिक कार्यकर्ते खांब यांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post