महाराष्ट्र वेदभुमी

.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला खुल्या व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फी माफी संदर्भात निवेदन....


 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खुल्या व इतर मागासप्रवर्गातील  विद्यार्थ्यांना फी माफी संदर्भात निवेदन


माणगाव प्रतिनिधी अक्षय कदम

दि. ०२/०८/२०२३ रोजी युवासेना महाड विधानसभा समन्वयक रोहित पारधे यांच्या नेतत्वाखाली विद्यापीठ व प्रशासनाने प्रथम वर्षामधील खुल्या प्रवर्गातील आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीमध्ये  सवलत दिल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत केले आहे...तसेच विद्यापीठाचे आभार मानले... 

गोरेगाव शहर अधिकारी रोहित पहेलकर,मितेश ढेपे, प्रतीक साळुंखे व अन्य युवासेना पदाधिकारी उपस्थित

युवासेना माणगाव तालुका चिटणीस अक्षय कदम, युवासेना उपतालुकाप्रमुख संदेश घोसाळकर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.सरपंच तसेच लोणेरे विभाग प्रमुख  प्रभाकर ढेपे,युवासेना विभाग प्रमुख अनिश बामणे,युवासेना विभाग प्रमुख गोरेगाव रुपेश रातवडकर,गोरेगाव शहर अधिकारी रोहित पहेलकर,मितेश ढेपे, प्रतीक साळुंखे व अन्य युवासेना पदाधिकारी उपस्थित होते...

खुलावर्ग व इतर मागासवर्गामधील  विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने सवलत दिली आहे... तशीच सवलत द्वितीय,तृतीय आणि अंतिम वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात यावी...

सदरील वर्षी रायगड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती...अशा परिस्थितीत शेतकरी,कामगार तसेच गोरगरीब कुटूंबातील विद्यार्थी  विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहेत...विद्यापीठाने प्रथम वर्षातील खुलावर्ग व इतर मागासवर्गामधील ज्या पद्धतीने सवलत दिली आहे...अगदी तशीच सवलत द्वितीय,तृतीय आणि अंतिम वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात यावी... या आशयाचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डीन डॉ.नलबलवार यांना दिले...

विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळावयाची अपेक्षा

तरी आपण विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीचा पुनर्विचार करून त्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली...

Post a Comment

Previous Post Next Post