महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांच्या कडून राजिप प्राथमिक शाळा आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप .

 

   

कोलाड प्रतिनिधी श्याम लोखंडे

राजिप प्राथमिक शाळा आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे तसेच आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचा तथा रोहा पंचायत समिती माजी सदस्या चेतना लोखंडे यांच्या मार्फत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले...

यावेळी जेष्ठ नागरिक, शिक्षक वर्ग,सदस्य,आणि असंख्य महिला वर्गांची उपस्थिती

मंगळवार दि.१ ऑगस्ट २०२३रोजी राजिप प्राथमिक शाळा आंबेवाडी येथील इयत्ता १ ली ते ४ थी च्या  ६४ विद्यार्थ्यांना वही,पेन, पेन्सिल, व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे व सौ चेतना लोखंडे यांच्या मार्फत करण्यात आले...यावेळी जेष्ठ नागरिक मारुती लोखंडे,रायगड भुषण पत्रकार डॉ. श्यामभाऊ लोखंडे,रायगड भुषण पत्रकार विश्वास निकम,रामदास लोखंडे,शिक्षणसमिती अध्यक्षा ईश्वरी लोखंडे,उपाध्यक्ष दिनेश लोखंडे,व सर्व सदस्य आणि महिला वर्ग,मुख्यध्यापक गणेश गर्जे, शिक्षक सिमा गर्जे, सुचिता माने व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते...


पत्रकार श्यामभाऊ लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन 

श्यामभाऊ लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपले मत व्यक्त केले...सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे व चेतना लोखंडे यांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे वापर चांगले गुण संपादन करण्यासाठी करा... कोणी डॉक्टर, कोणी पायलट होईल... कोणी तहसीलदार होईल...परंतु शेती करणे विसरू नका... शेती हा रायगड जिल्हयाचे भाताचे कोठार आहे...तसेच चंद्रकांत लोखंडे यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले... मुख्यध्यापक गणेश गर्जे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले..


Post a Comment

Previous Post Next Post