तळा प्रतिनिधी नंदिनी भोसले
वर्षभरात केलेल्या कामाच्या सन्मानार्थ रायगड जिल्हास्तरीय उत्कृष्ट तलाठी पुरस्कार
दि.०७ ऑगस्ट, २०२३ रोजी महसूल सप्ताह उपक्रमाच्या सांगता समारोहानिमित्त वर्षभरात केलेल्या कामाच्या सन्मानार्थ रायगड जिल्हास्तरीय उत्कृष्ट तलाठी म्हणून तळा सजाचे तलाठी प्रविण गवई यांचा गौरव करण्यात आला...
रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, भा.पो.से. यांच्या शुभहस्ते केला पुरस्कार प्रदान
यावेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. योगेश म्हसे, भा.प्र.से.यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगड जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, भा.पो.से. यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... निस्वार्थपणे काम करीत गेलो की त्याची नोंद कुठे ना कुठे नक्कीच ठेवली जाते...शिवाय त्याची आपण अपेक्षा केलेल्या फळापेक्षाही उत्तम भेट आपल्याला मिळते... आजचा पुरस्कार केवळ पुरस्कार नसून माझ्या भावी जीवनात अशाच पध्दतीने काम करण्यासाठी मला प्रदान केलेली उर्जा आहे..असे मी मानतो.. हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझ्या एकट्याचा नसून मला प्रत्येकवेळी मार्गदर्शन करणा-या माझ्या वरीष्ठांचा आणि मला नेहमी सहाय्य करणा-या माझ्या सहका-यांचा आहे...हा पुरस्कार सदैव चांगले काम करण्याची मला प्रेरणा देईल...असे त्यांनी बोलताना म्हटले आहे...
