शहानवाज मुकादम प्रतिनिधी रोहा
२० वर्षापासुन येथील स्थानिक ग्रामस्थाना त्रास...खैरेखुर्द-चांडगाव रस्त्याची दुरावस्था, रस्त्यात खड्डे की खडड्यात रस्ते
७ ऑगस्ट,रोहा तालुक्यातील चणेरा खैरेखुर्द-चांडगाव रस्त्याची दुरावस्था, रस्त्यात खड्डे की खडड्यात रस्ते असा संभ्रम निर्माण झालाय...त्यामुळे येथिल ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत... असे असूनदेखील स्थानिक आमदार खासदार कोरोना काळापासून गायब...टेमघर फाटा ते खैरेखुर्द मार्गे तळवडे चांडगाव असा जवळपास ५ किमी चा हा रस्ता असून ८ते९ गाव यामुळे जोडलेली आहेत...असे.असेल तरी सद्या मात्र या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे... या रस्त्याचा गेली २० वर्षापासुन येथील स्थानिक ग्रामस्थ हा त्रास सहन करत आहेत...राजकीय प्रतिनिधीना मात्र या रस्त्याची चिंता अजिबात राहिलेली नाही असे दिसून येते...मात्र कामे न करताच शेष फंडांतर्गत कामातील भ्रष्टाचारी यांना पाठिशी घालत असल्याचे येथिल स्थानिकांचे मत असल्याचे दिसुन येते...
भाई पाशीलकर साहेब व सिनकर मॅडम यांनी केलेले विकास कामे व कोरोना काळात आमदार खासदारांनी दुर्लक्ष केल्याने चणेराच्या स्थानिकांना आता भाईंची आठवण
राष्ट्रवादी पक्षाचे राजिप चे माजी अध्यक्ष श्री भाई पाशीलकर आणी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली सदानंद सिनकर यांच्या कालावधीत विकास कामे असो किंवा नागरिकांच्या समस्यां यावर उपाय म्हणून ते कर्तव्य पार पाडत असल्याचे येथिल स्थानिकांचे मत आहे...आज चणेरा खैरेखुर्द ते चांडगाव या रस्त्याची दुरावस्था व नागरिकांच्या समस्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने भाई पाशीलकर साहेब व सिनकर मॅडम यांनी केलेले विकास कामे व कोरोणा काळात आमदार खासदार यांनी केलेला दुर्लक्ष यामुळे चणेराच्या भाईंची आठवण नेहमीच राहील...
शिंदे-फडणवीस सरकारकडून १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी पुर्व रस्ता दुरुस्तीची मांगणी...
त्यानंतर चणेराचा भाई कोण या मुद्द्यांवर मा.सुनील तटकरे साहेब यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत श्री भाई पाशीलकर साहेबांचा पराभव करून श्री रामचंद्र सकपाळ यांना विजय करून चणेरा विभागाला नाना दिला आणी चणेरा विभागातून भाई हा नाव गायबच झाला...तरीही शिंदे-फडणवीस सरकारकडून सदरचा रस्ता चणेरा ते चांडगावपर्यत मंजूर करण्यात यावा...तसेच १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पुर्व किमान रस्त्यातील खड्डे मुक्त रस्ता होण्यास तातडीने दखल घेण्याची मागणी येथिल स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत...
