महाराष्ट्र वेदभुमी

खांबवली येथे कृषी विभागातर्फे मीलेट रॅलीचे आयोजन.



तळा प्रतिनिधी नंदिनी भोसले

नाचणी, वरई, राळा,कांग या पौष्टीक तृणधान्य पिकांची माहिती, त्यांचे आहारातील महत्व,याविषयी जगजागृती

तळा तालुक्यातील  येथे ९ ऑगस्ट २०२३ रोजी कृषी विभागातर्फे मीलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते...व पौष्टिक तृणधान्य महत्व या विषयी परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात होते...नाचणी, वरई, राळा,कांग या पौष्टीक तृणधान्य पिकांची माहिती, त्यांचे आहारातील महत्व, पाककला, प्रक्रिया पदार्थ याविषयी जगजागृती व्हावी यादृष्टीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.. 

तृणधान्याचे आहारातील महत्व, पौष्टीक तृणधान्य प्रक्रियेतील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले... कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती

तसेच खांबवली येथील पौष्टिक तृणधान्य याविषयी परिसंवादा घेण्यात आला... यामध्ये प्रथम तळा तालुक्यामध्ये पौष्टिक तृणधान्य प्रचार , प्रसिद्धीसाठी कृषी विभाग घेत असलेल्या उपक्रमाविषयी मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी प्रास्तविक केले..व प्रत्येकाने पौष्टीक तृणधाण्याचा आपल्या आहारात समावेश करावा असे आवाहन केले... यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी पौष्टीक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व भविष्यातील संधी, पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व, पौष्टीक तृणधान्य प्रक्रियेतील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले... व कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती सांगितली आदिवासी बांधवानी मधुमक्षिका पालन करावे यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले...तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नाचणी वरी राळा कांग या पिकांच्या क्षेत्रात वाढ करावी या तृणधान्यांना बाजारपेठेमध्ये खुप मागणी असल्याचे सांगितले...

कृषी सहाय्यक दिनेश चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीलेट रॅलीचे आयोजन

यानंतर कृषी सहाय्यक दिनेश चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले...रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते...या रॅलीमध्ये पौष्टिक तृणधान्य विषयी घोषणाबाजी करून प्रचार करण्यात आला...या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव ,सरपंच शेणवली निकिता गायकवाड,सरपंच शेणाटे जनाबाई कोळी, कृषी सहाय्यक दिनेश चांदोरकर,विनोद तुपे शिक्षक ,शीला  बिऱ्हाड शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते....

Post a Comment

Previous Post Next Post