महाराष्ट्र वेदभुमी

म्हसळा तालुक्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार!

म्हसळा प्रतिनिधी शहानवाज मुकादम 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक सुभान इक्बाल हळदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटामध्ये केला  प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक श्री सुभान इक्बाल हळदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जिल्हा प्रमुख मा.श्री अनिल जी नावगणे,साहेब यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून व त्यांची मुस्लिम समाज यांच्यावर जे प्रेम आहे त्याला लक्षात घेता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे...

मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश 

 त्याचबरोबर म्हसळा शहराचे उच्च शिक्षित श्री नदीम भाई दफेदार व असंख्य मुस्लिम समाजाचे लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असुन मुस्लिम समाजातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे चित्र समोर येत आहे...

पदाधिकारी व असंख्यक कार्यकर्ते उपस्थित 

 यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख श्री अनिल जी नवगणे, दक्षिण रायगड प्रमुख श्री नंदू शेठ शिर्के, नगरसेविका श्रीमती राखी करंबे, नगरसेवक अनिकेत पानसारे ,म्हसळा तालुका अल्पसंख्यांक प्रमुख श्री शौकत भाई हजवाने,पदाधिकारी व असंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post