अलिबाग ओमकार नागावकर
शब्दधन सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य (बारामती) यांच्या तर्फे शब्दधन राज्यस्तरीय पुरस्कार
शब्दधन सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य (बारामती) यांनी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन खुल्या काव्यवाचन स्पर्धेत श्री.स.म.वडके विद्यलय, चोंढी - किहीम मधील सहाय्यक शिक्षक धनंजय सुरेश भगत सर यांना प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल त्यांना शब्दधन सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य (बारामती) यांच्या तर्फे शब्दधन राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले...
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले अभिनंदन
त्याबद्दल त्यांचे लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, कार्यवाह रविंद्र ठाकूर, सहकार्यवाह संजय शिंदे, खजिनदार श्याम काठे, कायम सदस्य गणेश आमले तसेच संस्थेचे सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत दळवी सर, उपमुख्याध्यापक बाविस्कर सर, पर्यवेक्षिका भारंबे मॕडम, शिक्षक सेवक प्रतिनिधी वाघमारे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले...
