अलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव): अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ म्हणजे एक नंबरची बाजारपेठ आणि तिथे गेले दोन महिन्यापासून हा असा खड्डा पडलेला आहे... प्रवाशांचे मोटार सायकल चालविणाराचे बहुतेकदा टायर या खड्डामधे जातात परिणामी अपघाताची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
जिथे हा खड्डा पडलेलाय ते ठिकाण बाजारपेठेच्या तसेच पोयनाड चवरकर आळी व रामआळीच्या मध्यावर असल्याने मालवाहतुकीच्या गाडया वारंवार ये जा करतात... पोलीस स्टेशकडून येणारी वाहतूक याच ठिकाणी येऊन मिळते... त्यांमुळे या चारचाकी गाडयांना वारंवार या खड्डयांचा सामना करावा लागतो... स्थानिक नागरिकांच म्हणणं आहे की यांपूर्वी या खड्डयांला बुजविण्यात आला होता तरीही पुन्हा पुन्हा खड्डा पडतोय... सदर स्थानिक प्रशासनाने व ग्रामपंचायतीने यांची दखल घेऊन पडलेला खड्डा उत्कृष्ट काम करून पुन्हा पडणार नाही या हेतुने बुजविण्यात यावा... अशी मागणी बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांची मागणी आहे... वारंवार अशा प्रसंगाना सामोर जावे लागत असल्याने उत्कृष्ट दर्जाचे माल वापरून योग्य ती उपाययोजना करून खड्डा बुजविण्यात यावा...यांमुळे प्रवांशाचे होणारे हाल थांबतील...
