महाराष्ट्र वेदभुमी

सह्याद्री वन्यजीव संरक्षण सामाजिक संस्था रायगड यांचे शोध व बचाव कार्य.

रोहा प्रतिनिधी: (राकेश धुमाळ): दि. २५/६/२६. एस व्ही आर एस एस ही रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळणारी एक प्रमुख संस्था असून रायगड जिल्ह्यातील आपत्तीव्यवस्थापनात प्रशिक्षित व कुशल सदस्यांमुळे महत्वाची भूमिका बजावत असते... 

दिनांक २४ जून रोजी रोहा पोलीस ठाण्याकडून माहिती प्राप्त झाली की, रोहा-अष्टमी मार्गावरील कुंडलिका नदीवरील पुलावरून एका महिलेने नदीपात्रात उडी मारली असून या घटनेला एक दिवस पूर्ण झाला आहे... सदर महिलेचा शोध घेण्यासाठी एस व्ही आर एस एस या संस्थेकडे सहकार्याची विनंती करण्यात आली...

 घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर असे समजले की, दिनांक २३ जून रोजी सकाळी अंदाजे ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान एका नागरिकाने संबंधित महिलेला नदीपात्रात उडी मारताना पाहिले होते... मात्र, त्यांनी या घटनेची माहिती कोणालाही दिली नव्हती... महिला घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सायंकाळी रोहा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली...या अनुषंगाने दि. २४ जून रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास कुंडलिका नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली... शोधकार्यादरम्यान जवळपास साडेआठ किलोमीटर अंतरावरील कुंभोशी गावाच्या हद्दीत हरवलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आला...सदर शोध मोहिमेत रोहा पोलीस प्रशासन तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाने संयुक्तरीत्या सहभाग घेत शोधकार्य राबवले... मृतदेह हस्तगत करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सदस्यांकडून देण्यात आली...

   सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेने आपल्या  साहसी आणि त्वरित प्रतिसादाने जनमानसात विश्वासार्हता निर्माण केली आहे....

Post a Comment

Previous Post Next Post