आपुलकी फाउंडेशनचा अनोखा उपक्रम
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- शहरातील आपुलकी फाउंडेशन आयोजित 'सौभाग्यवती भव' हा एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन सोमवार (ता.२९) ला वटपौर्णिमेनिमित्त घेण्यात येणार आहे... लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ..! वटपौर्णिमा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत... वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाला फेरे मारतात... यादिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून पुढील सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते... हा सण नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी अतिशय खास आहे... आज आम्ही तुम्हाला वटसावित्रीचे अवचित्य साधून वटपौर्णिमेनिमित्त "सौभाग्यवती भव" ह्या अभिनव स्पर्धेला आनंदी करण्यासाठी आपुलकी फाउंडेशन आयोजन करणार आहे... महिलांनी मराठी संस्कृतीला साजेशी साडी किंवा नऊवारी पातळ घालून वेगवेगळ्या प्रकारच्या साज शृंगार करून वडाच्या झाडाखाली पूर्ण साईज किंवा बसलेला वडाच्या झाडाच्या सोबत सुंदर आकर्षित फोटो मोबाईल द्वारे काढून आयोजकाच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा... सुंदर आकर्षक व देखना फोटो परीक्षकाद्वारे निवड करून सर्वोत्कृष्ट परिधान केलेल्या महिलेला प्रथम पुरस्कार म्हणून सोन्याची नथ, द्वितीय पुरस्कार चांदीच्या शिक्का व तृतीय पुरस्कार ट्रॅव्हलिंग बॅग दिली जाणार असून इतर सहभागी १५ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल... "सौभाग्यवती भव"स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या महिलांनी आपुलकी फाउंडेशनच्या कविता मुलमुले, उज्वला धामगाये, चित्रा धूरई, मीनल भारंबे, शिल्पा रणदिवे, समिता पटले, अर्चना ठक्कर ,नीता पायतोड , प्रिया मानकर,सोनी धुरई, श्वेता गोन्नाडे, समीक्षा धमगाये, रश्मी गोन्नाडे, ललिता बावनथडे, नेहा गावंडे, श्रद्धा कावळे, रोहिणी नागोसे, सुषमा मानापुरे, पूनम मानकर, साक्षी धूरई, करिष्मा महाजन यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
