महाराष्ट्र वेदभुमी

स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे द्या! स्पीड ब्रेकर झाले धोकादायक..

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- गाडय़ांच्या वेगावर मर्यादा रहाण्यासाठी रामटेक-मौदा राज्य मार्गावरील किट्स महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूला  दोन-दोन असे चार मोठे स्पीड ब्रेकर बसवले आहेत... मात्र हे स्पीड ब्रेकर वाहनचालकांच्या लक्षात यावेत यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारणे आवश्यक आहे... मात्र त्या वरील पांढरे पट्टे पूर्णपणे पुसट झाल्याने अपघाताचा घोका वाढला आहे... वाहनचालकांना स्पीड ब्रेकर वेळेत दिसत नसल्याने अचानक ब्रेक लावावे लागत असून त्यामुळे गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे... मौदा किंवा रामटेककडून येणाऱ्या जड वाहन ट्रक व अन्य जड मालवाहू  वेगात येत असताना स्पीड ब्रेकर अचानक समोर आल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने ब्रेक मारतात... यामुळे मागील वाहनांना धडक बसण्याचा धोका किवा वाहन अनियंत्रित  होण्याची शक्यता निर्माण होत आहे... किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात दररोज शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच पालकांची मोठी वर्दळ असते... त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पीड ब्रेकर स्पष्ट दिसणे अत्यंत आवश्यक आहे... स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने या स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे परावर्तक पट्टे रंगवून आवश्यक सूचना फलक लाववेत अशी मागणी केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post