महाराष्ट्र वेदभुमी

शासन आमच्या मरण्याची वाट पाहत आहे का ?

 


रखडलेल्या वेतनासाठी वनमजुरांचे बेमुदत उपोषण 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- तालुक्यातील वनविभागाच्या देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रात वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या ९४ हंगामी वनमजुरांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन रखडल्यामुळे त्यांनी २२ जूनपासून बेमुदत उपोषणाचे सुरू केले होते... प्राथमिक प्रतिसाद दल, जलद प्रतिसाद पथकातील या मजुरांनी (दि.११) जून रोजी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना थकीत वेतनाबाबत निवेदन दिले होते... मात्र प्रशासनाने केवळ एका महिन्याचे वेतन देऊन बोळवण केल्याने संतापलेल्या मजुरांनी हे आंदोलन पुकारले... अखेर सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे, वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले, व सागर बंसोड यांनी दिलेल्या ठोस आश्वासन दिल्यानंतर वनमजुरांनी आंदोलन मागे घेतले... अवैध वृक्षतोड रोखणे, वणवा विझविणे, आणि बिबट्या वाघांसारख्या हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे रक्षण करणे अशी जीवाची जोखीम असणारे कामे हे मजूर करतात... वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासन २५ लाखांची भरपाई देते. मग अशा घटना रोखणाऱ्या रक्षकांचे ६ महिन्याचे वेतन रखडवणे लाजवणारी बाब नाही काय? शासन आमच्या मरण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला... ऐन पेरणीच्या हंगामात शेतात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असतांना हे आंदोलन झाल्याने वनव्यवस्थापन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे... प्रशासनाने यावर तत्परतेने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post