महाराष्ट्र वेदभुमी

मेढेंखारमध्ये मोहरम सण हिंदू गावकरी साजरा करतात ..

 

आलिबाग वार्ताहार (स्वाती जाधव): २६/६/२०२६ रोजी मेंढेखार गावात मोहरम सण हिंदू बांधवांच्या हातून करण्यात यश.. मोहरम हा मुस्लिमाचा सण असून हिंदू समाजाचे लोक का साजरा करतात व पेंढयाचा पाऊस का पाडतात या मागे एक आख्यिका आहे...

१० दिवस १० गावांमधे मोहरम साजरा करणाऱ्या या हिंदू गावाबदूदल अशी आख्यिका आहे की २०० वर्षापुर्वी या गावाला बंधारा नव्हता त्यांमुळे येथील शेतकराचे खुप नुकसान व्हायचे काही केल्या बंधारा राहत नव्हता.पण या गावामधे दोन फकीर आले आणि त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी बांधलेला बांधरा कधीही तुटला नाही...

गावकरांच्या मते एका इस्माला स्वप्नात वारूळाच्या ठिकाणी दोन पायाचे पंन्जे दिसले असा साक्षात्कार झाला म्हणून ते या फकीराना शोध घेतला असता ते गायब झालेले होते म्हणून येथील गावकरांनी तिथे पीर बाबाचा मंदीर बांधला...

तेव्हापासून या गावात धर्मनिरपेक्षता सोडून हिंदू बांधवाना या मोहरमचा मान दिला जातो, या गावातील खास वैशिष्टय म्हणजे पेंढे उडवले जातात आणि जमिनीवर पडलेले पेंढे प्रसाद म्हणून येथील गावकरी आणि जमलेले भाविक खातात... एकीने हा मोहरम सण साजरा करतात... असा आलिबाग तालुक्यातील एकमेव गाव म्हणजे मेंढेखार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post