महाराष्ट्र वेदभुमी

जनगणननेच्या कामावर असताना शिक्षिकेची अपघात मृत्यू शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त!

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील):जातक व  नियमबाह्य कारभारावर प्रश्न चिन्ह? शिक्षकांनी शाळा सोडून दारोदारी भर उन्हात फिरून पुन्हा आपले रोजच्या कामावर हजर राहणे बंधनकारक केलेला सरकारी निर्णय आज जीवावर बेतला याला जबाबदार कोण? कामाचा व मानसिक त्रास नाही का हा! 

मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे जनगणनेच्या शासकीय कामासाठी जाताना दिपाली तांबे नावाच्या महिला शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाला... भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला... या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात शिक्षकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...घटनेची सविस्तर माहितीमावळ भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतानाही शिक्षकांना जनगणनेच्या (Census) अशैक्षणिक कामासाठी लांब अंतरावर पाठवण्यात आले होते... या कामासाठी जात असताना जुना पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने शिक्षिकेच्या दुचाकीला धडक दिली... या हृदयद्रावक अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने मावळ परिसरासह राज्यभरात शोककळा पसरली आहे.जनगणनेच्या ड्युटीबाबत संतापशासकीय सुट्टीच्या काळात शिक्षकांकडून जबरदस्तीने किंवा चुकीच्या नियोजनाखाली जनगणनेचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत... या घटनेमुळे शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे... यापूर्वीही जनगणनेच्या कामाशी संबंधित ड्युटीवर असताना राज्यातील अन्य शिक्षकांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत... त्यामुळे या अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे... यावर आता सरकार काय नियोजन करते यावर शिक्षकांचे व इतर सरकारी क्षेत्रातील कर्मचार्यांचे लक्ष लागून आहे... ही जाचक व जबरदस्तीची नोकरी करावी की नाही असा प्रश्न आज सरकारी कर्मचार्यांना पडला आहे. नाही म्हटले तर घरी बसा असे आदेश वरूनच येतात मग पोटाची खळगी भरण्यासाठी जीव मुठीत घेऊन नोकरी करावी लागते...

Post a Comment

Previous Post Next Post