महाराष्ट्र वेदभुमी

जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

माणगाव :- (नरेश पाटील) रायगड रोड परिसरातील घरोशी वाडी येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील जंगलात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे... निधी राजेश उतेकर (वय 15) असे मृत मुलीचे नाव असून ती काही दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आली होती...

माहितीनुसार, निधी ही दि. 25 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती... तिचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांनी माणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती... पोलीसांकडून शोधमोहीम सुरू असतानाच दि. 27 मे रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील जंगल परिसरात एका मेंढपाळाला संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला...

घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले... मृतदेह जंगलातील दुर्गम भागात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली... पोलिसांनी मुलीच्या पालकांना घटनास्थळी नेले असता त्यांनी मृतदेहाची ओळख निधी उतेकर अशी पटवून दिली... बेपत्ता प्रकरणानंतर दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे...

घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स पथक, श्वानपथक तसेच पोलीसांचे विशेष तपास पथक दाखल झाले होते. परिसराची तपासणी करून पुरावे गोळा करण्याचे काम करण्यात आले... मृतदेह ताब्यात घेण्यासाठी श्री बालाजी ॲम्ब्युलन्स, माणगावचे प्रोप्रायटर श्री उमेश रिकामे तसेच त्यांचे सहकारी शुभम मोहिते घटनास्थळी पोहोचले होते...

या घटनेमुळे घरोशी वाडी तसेच रायगड रोड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post