प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मुसेवाडी मंडळ येथे मातोश्री काशीदेवी महाविद्यालय मुसेवाडी रामटेक (दि.१७) येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रमेश कोळपे तहसिलदार रामटेक यांचे नियोजनाखाली सदर शिबीर यशस्वीरीत्या आयोजीत करण्यात आले. या शिबिरात मुसेवाडी मंडळांतर्गत ग्रामपंचायत आसोली, भंडारबोडी, शिवनी भो, मुसेवाडी, मान्द्री, महादुला, पिंडकापार सो. गुगुलडोह, पंचाळा बु. डोंगरी, उमरी चि., पुसदा-२ गावातील नागरिकांनी विविध विभागामार्फत एकूण ४२२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. महसूल विभागामार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप, ७/१२ उत्तारे, फेरफार नोंदणी व उत्पन्न दाखले देण्यात आले. 'आपले सरकार' केंद्रांतर्गत ४९ प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले, तसेच आधार नोंदणी १२, संजय गांधी निराधार योजना १५, पुरवठा विभाग ६, भूमी अभिलेख ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. आगार व्यवस्थापक यांचे तर्फे ५० महिलांना प्रवासात ५० टक्के सुट सवलत पास देण्यात आली. आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी, पंचायत समितीच्या ४६ योजना, तसेच महिला बाल विकास विभागामार्फत १७ बेबी केयर किट वाटप करण्यात आले. सदर शिबीरात मारोती भुजाडे सहा. गटविकास अधिकारी, संगिता चंद्रिकापुरे, महिला व बालविकास अधिकारी, भोजराज बडवाईक नायब तहसिलदार, संदेश हलमारे निरीक्षण अधिकारी, सुनिल कोरटे, तालुका कृषी अधिकारी, भुषण निखाडे, मंडळ अधिकारी, मुसेवाडी मंडळातील सर्व ग्राम महसुल अधिकारी तसेच व वैद्यकीय चमु, बस आगर व्यवस्थापक सेतु, आधार, महिला बचत गट महसुल विभागातील अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिराकरिता उपस्थित होते...
