महाराष्ट्र वेदभुमी

सराखा-बोरडा येथील तरुणाचा तुमसरात संशयास्पद मृत्यू

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-लग्न समारंभासाठी (ता. तुमसर ) येथे गेलेल्या सराखा-बोरडा, ता. रामटेक येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली... राजेश राघोजी शेरकुरे  (वय ३६) असे त्याचे नाव असून, हा मृत्यू अपघात की घातपात, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे... या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे... राजेश शिरकुरे हा शुक्रवार (दि.१७) एप्रिल रोजी लग्न समारंभासाठी तुमसर तालुक्यातील गावाला गेला होता... मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तुमसर शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील घनकचरा संकलन केंद्राजवळ पाण्यावर एक मृतदेह तरंगताना नागरिकांना  दिसला... तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी भाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता हातावरील 'राजेश' या नावावरून मृतदेहाची ओळख पटली... पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले... प्राथमिक अंदाजानुसार मृतकाला व्यसनाच्या आधारे किंवा अन्य कोणत्या कारणाने त्याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी... असा संशय व्यक्त केला जात आहे... मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही... शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंब कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला... बोरडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले... या प्रकरणाचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post