महाराष्ट्र वेदभुमी

चोंढी रेल्वे फाटकाच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

सोगाव - अब्दुल सोगावकर : तालुक्यातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या अलिबाग-रेवस मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे... या मार्गावर चोंढी येथे रेल्वे फाटकावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सर्वांनाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे...

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांसह स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने हे खड्डे तातडीने भरावेत अशी मागणी आहे... अलिबाग-रेवस मार्गावरील थळ, चोंढी, किहीम, झिराड, आवास, सासवणे, मांडवा, म्हात्रोळी, रेवस भागात मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योजक आदींचे फार्महाऊस, रस्ते, तसेच विकासात्मक बांधकामे सुरू असून, त्या बांधकामासाठी लागणाऱ्या खडी, रेती, डबर, माती, सिमेंट, लोखंडी सळया, पाण्याचे टँकर आदी लागणाऱ्या तत्सम वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यांच्या फेऱ्या वाढल्या असून, यामुळे या मार्गावर चोंढी, झिराड नाक्यावर विविध कारणांनी वाहतूक कोंडी होत आहे... मात्र याबाबत संबंधित अधिकारी, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे... तरी याबद्दल प्रशासन कधी जागे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

फोटो लाईन :चोंढी नाका येथील रेल्वे फाटकावर झालेली वाहतूक कोंडी

छायाचित्र - अब्दुल सोगावकर

Post a Comment

Previous Post Next Post