माणगाव: (नरेश पाटील): न. पंचायतीने दि.२७,२८ मार्च २०२६ रोजी देखभाल कामांसाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ४८ तासांऐवजी ३६ तासांत पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलीय...
कारण दि.२६ मार्च रोजी पाणीपुरवठा करण्यात आला होता; मात्र तो नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरू झाला आणि केवळ ४५ मिनिटां पुरताच मर्यादित राहिला. त्यातही सुरुवातीस गढूळ,मळकट पाणी आल्याने नागरिकांना ते पाणी वाया घालवावे लागले... परिणामी, दोन दिवसांच्या पाणीटंचाईपूर्वी नागरिकांना अपेक्षित प्रमाणात पाणी साठवता आले नाही...
विशेष म्हणजे, मागील महिन्यातही अशाच प्रकारे ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली होती... वारंवार अशा प्रकारे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढतोय... यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून,सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे अधिकच त्रासदायक ठरतेय... असे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने देखभाल कामांचे नियोजन अधिक कार्यक्षम पद्धतीने करावे... पाणीपुरवठा ४८ तासां नको तर ३६ तासांत सुरू करावा, अशी जोरदार मागणी होतेय...
दरम्यान, पाणीपट्टीत झालेली वाढ नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरतेय... पूर्वी ₹१,००० असलेली पाणीपट्टी आता ₹२,००० करण्यात आलीय... मात्र, वाढीव कर भरूनही पाणीपुरवठ्याची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याची तीव्र भावना नागरिकांत आहे...
गळती, अपुरी देखभाल, कमी दाबाने होणारा पुरवठा, गढूळ पाणी, वेळेत होणारे बदल, कमी कालावधीचा पुरवठा, तसेच वारंवार देखभालीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवणे अशा विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत...
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून माणगाव नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात.... नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करून नियमित, स्वच्छ व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे...
