महाराष्ट्र वेदभुमी

मोहपाडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काव्य स्पर्धेचे आयोजन

रसायनी-मोहपाडा अजय शिवकर: डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेल्या 36 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रमाद्वारे समाज जागृतीचे कार्य केले जाते, त्यामध्ये मुख्यतः वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती स्त्रिया आणि अंधश्रद्धा, वारसा समाज सुधारकांचा, सर्प विज्ञान, साहस शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन संवाद, बुवाबाजी व चमत्कार फलज्योतिष आणि खगोलशास्त्र, स्त्री पुरुष समानता, भारतीय संविधान व धर्मनिरपेक्षता, जोडीदाराची विवेक निवड, महिला सबलीकरण अभियान, अवयव दानअभियान, फटाके मुक्त दिवाळी अभियान, असे अनेक प्रबोधनकारी कार्यक्रम करून समाज जागृती केली जाते...

 रविवार 29 मार्च रोजी रसायनी मोहपाडा येथे आत्ताच्या परिस्थितीवर जनजागृती करण्यासाठी अंधश्रद्धा या विषयावर काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली...

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्य रत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील विश्वस्त कोमसाप, यांनी भूषविले... तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन उमाताई मुंडे सरपंच चांभार्ली मोहोपाडा यांच्या हस्ते झाले...

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण गोवा रस्त्याचे अभ्यासक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील, कोमसाप उरण अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, नशाबंदी प्रचारक लवेंद्र मोकल, असे होते ...तसेच या काव्य स्पर्धेचे परीक्षक डॉ राजेंर राठोड,महेंद्र सर होते...

 काव्य स्पर्धेत नरेश पाटील, अजय शिवकर, रोहिदास कवळे, कृष्णा गावडे,कल्याणी मुळे, अजीत कडलक, चेतना सावंत, बी.एन.घरत, बी.डी.पाटी ल, राजेंद्र जाधव, कामिनी खाने ,विजय कुमावत, प्रदीप गर्जे, अनिल सोनावणे, इत्यादी 43 कवींचा सहभाग होता...नरेंद्र दाभोलकरांचे विचार कवींनी  कवितांमध्धे निर्भीडपणे 

मांडावेत....असे प्रतिपादन साहित्य रत्न रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील. यांनी सर्व कवींना उद्देशून केले...

Post a Comment

Previous Post Next Post