महाराष्ट्र वेदभुमी

गौरवास्पद आणि अभिमानास्पद कार्याचा कोमसापकडून साहित्यरत्न प्रा.एल.बीं यांचा सन्मान !

 

उरण:अजय शिवकर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३५ व्या वर्धापनदिनी    केशवसुत स्मारक मालगुंड रत्नागिरी येथे भव्य सोहळ्यात कोमसापचे विश्वस्त साहित्यरत्न रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांनी  कोमसापचे ३५ वर्षे केलेले संघटनात्मक कार्य आणि नवोदित साहित्यिकांसाठी प्रोत्साहन देऊन अभिमानास्पद साहित्य सेवा केली, त्याबद्दल कोमसापकडून पद्मश्री मधुभाई कर्णिक यांच्या शुभहस्ते मानपत्र देऊन प्रा.एल.बींना गौरविण्यात आले....

 यावेळी परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, स्मारक समिती अध्यक्ष गजानन (आबा) पाटील, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, शोभाताई सावंत, संजय गुंजाळ, विद्या प्रभू, मंगेश म्हसके, आनंद शेलार, बाळ कांदळकर इ. सर्व जिल्हाध्यक्ष , कार्यवाह माधव अंकलगे, युवाध्यक्षा दीपा ठाणेकर, युवा अरुण मोर्ये, विवेक भावे,यशवंत कदम इ.ची प्रमुख उपस्थिती होती... पद्मश्री मधु भाईंच्या शुभहस्ते. "अभिमानास्पद कार्याचे मानपत्र" देऊन प्रा.एल.बींना सन्मानित करण्यात आले.,.

Post a Comment

Previous Post Next Post