महाराष्ट्र वेदभुमी

बसची दुचाकीला धडक; एक तरुण ठार, तर दुसरा जखमी

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक : काही कामानिमित्त मनसरहुन कांद्री वस्तीच्या दिशेने जात असताना दरम्यान बसची  दुचाकीला मागून धडक दिल्यानी झालेल्या अपघातात एक २३ वर्षीय तरुण ठार झाला असून एक तरुण जखमी झाला आहे... हा अपघात सोमवार (दि.३०) रात्री तालुक्यातील. मनसर कांद्री तलाव परिसरात झाला... नादीम खान नासिर खान (२३, रा. मनसर ता. रामटेक) असे तरुणाचे नाव आहे... मृत तरुण व त्यांचा चुलत भाऊ अनवार जाफर खान दोघे दुचाकीवरून (एमएच ४० सीएल ०२८७) बसून कामानिमित्त मनसर होऊन कांद्री वस्तीच्या दिशेने जात असतांना दरम्यान नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या भरधाव बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली... या धडकेत दोघेही दुचाकीसह खाली पडले. अपघातात नादीम खान यांच्या जागीच मृत्यू झाला... चुलत भाऊ अनवार खान यांच्या डोक्याला व गुप्तांगावर मार असून गंभीर जखमी झाला आहे... घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी गाव घेत मृत नदीम खान यांच्या मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले... तर जखमी अनवार खान वर नागपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...अपघातानंतर बस चालक घटना स्थळावरून प्रसार झाला असून पोलिसांकडून अज्ञात बस चालका विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे...

Post a Comment

Previous Post Next Post