महाराष्ट्र वेदभुमी

आदर्श विद्या मंदिर रामवाडी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा वर्तक सर यांच्या हस्ते कु.दामिनी प्रभाकर घायतळे यांचा सत्कार..!

 

पत्रकार कैलासराजे घरत  खारपाडा पेण :आदर्श विद्या मंदिर रामवाडी हे डिजिटल स्कूल आहे. येथ सर्व महिला शिक्षिका आहेत. पायाभूत शिक्षण मजबूत असेल तर उच्च शिक्षण सोपे जाते. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. या शाळेतील कु. दामिनी प्रभाकर घायतळे ही शिक्षिका उच्चशिक्षित आहे. ती अर्थशास्त्र या विषयात पीएचडी करत आहे. हे या संस्थेचे वैभव आहे.. या संस्थेचे अध्यक्ष पी.डी.पाटील व उपाध्यक्ष ह.भ.प. के.एम.वर्तक सर यांचे पूर्ण आशीर्वाद व मार्गदर्शन आहे.    कु.दामिनी प्रभाकर घायतळे यांना  संस्थेचे उपाध्यक्ष यांनी सन्मानित करत असताना वर्तक यांनी विचारले, बेटी तुझी काय इच्छा आहे! तेव्हा दामिनी म्हणाली मला या जिल्ह्याचे कलेक्टर किंवा शिक्षण क्षेत्रात उच्च अधिकारी व्हावी असे वाटते. त्यावेळी वर्तक सर म्हणाले जिद्द ठेव, मेहनत घे, आमचा हरी (देव)तुझ्या मनो कामना पूर्ण करील. असा आशीर्वाद वर्तक यांनी दिला. मोठी झालीस तरी या संस्थेला विसरु नको असे भावपूर्ण उद्गार काढले. संस्था, परिवार, तालुका ,जिल्हा, राज्य,देश, याचे वैभव वाढविणे हा तुमचा  स्वधर्म आहे...

Post a Comment

Previous Post Next Post