महाराष्ट्र वेदभुमी

माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांची नागरिकांविषयीची काळजी;


देखभालीपूर्वी रात्रीच अतिरिक्त पाणीपुरवठ्याची व्यवस्था

माणगाव:-(नरेश पाटील): नगरपंचायतीमार्फत पाणी साठवण टाक्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवार दि. २४ व बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी हाती घेण्यात आल्याने सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती... या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी माजी नगराध्यक्ष  ज्ञानदेव पोवार यांनी पुढाकार घेत विशेष काळजी घेतली...

  दि. २३ फेब्रुवारी रोजी दिवसभरात एकदा पाणीपुरवठा झाल्यानंतर रात्री दुसऱ्यांदा पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली... सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक साठा करून ठेवावा, या उद्देशाने ही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याचे पोवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. तसेच आसपासच्या भागातील नागरिकांनाही याची माहिती द्यावी, जेणेकरून सर्वांनी पाण्याचा साठा करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले..

रात्री पाणी सोडण्यात आल्याची माहिती मिळताच काही ठिकाणी त्यांना शेजाऱ्यांनी उठवून “पाणी आले आहे, लवकर उठा व भरा” अशी हाक दिल्याचे चित्र पाहायला मिळाले... त्यानंतर उशिरापर्यंत बादल्या, हंडे व भांड्यांमध्ये पाणी भरतानाचा आवाज परिसरात घुमत होता... विशेष म्हणजे रात्री सुमारे ११:४५ वाजेपर्यंत अनेक घरांमध्ये दिवे लागलेले दिसत होते...

खांदाड येथील प्रभाग क्रमांक १६ मध्ये तब्बल दोन-तीन तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा सुरू होता... काही जवळच्या भागात रात्री पाणीपुरवठा दिसून न आल्याने तेथील नागरिकांनी शेजारील परिसरातून पाणी आणून परस्पर सहकार्याची भावना जपली...

नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेला हा पुढाकार पोवार यांच्या जागरूकतेचा व लोकहितदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे... अडचणीच्या काळात तत्परतेने उचललेले असे पाऊल हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यभाव दर्शविते...

Post a Comment

Previous Post Next Post