महाराष्ट्र वेदभुमी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून १०कोटीचे आमली पदार्थ नष्ट

प्रतिनिधी: (सतिश वि.पाटील): "नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सन २०२४ मध्ये ३९ गुन्हयातील एकूण १० कोटी ६१ लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते... नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्य क्रमाचाच एक भाग म्हणुन आज (दि. २६) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण ४० गुन्हयातील जप्त करण्यात आलेले १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक याच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  प्रमुख उपस्थितीत शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी (तळोजा) या ठिकाणी नष्ट करण्यात आला...

     सन २०२३ व २०२४ मध्ये अंमली पदार्थाचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरोधात ११४३ गुन्हे दाखल करुन १७४३ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्याच्याकडुन एकुण ५६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे... त्यामध्ये एकण १११ आफ्रिकन नागरीकांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन ३८ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत... तसेच सन २०२३ व सन २०२४मध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या ११३१ आफ्रिकन नागरीक व २२४ बांग्लादेशी नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे... त्यामधील एकुण ११२८ आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हददपार करून परत पाठविले आहे...  शासनाच्या धोरणानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतुन व पुढाकाराने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाची सुरवात दिनांक ०८ जानेवारी २०२५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली... 

सदर "नशा मुक्त नवी मुंबई" कार्यक्रमाचा बॅन्ड ॲम्बेसिडर म्हणुन प्रसिद्ध सिने अभिनेता जॉन अब्राहम याची खास नेमणुक करण्यात आली आहे... सदर कार्यक्रमामध्ये नवी मुंबई परिसरातील शाळा-कॉलेज/सोसायटी मधील नागरीकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन, त्यांची अंमली पदार्थाचे दुष्परिणामाच्या अनुशंगाने जनजागृती करण्यात आली तसेच आमलीपदार्थांच्या अनुशंगाने नागरीकांना माहीती देण्याकरिता ८८२८-११२-११२ हा हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे.. शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर व होर्डिग्ज लावण्यात आले आहेत तसेच नवीमुंबई आयुक्तालयामधील शाळा, कॉलेज मध्ये तसेच रहिवाशी सोसायटी, रेल्वेस्थानक परिसरात वेळोवेळी जाऊन विद्यार्थी व नागरिकांमध्ये आमली पदार्थाचे दुष्परिणाम अनुषंगाने जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे  मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ही सरकार मान्य वेस्ट डिस्पोजेबल कंपनी असून या कंपनीमध्ये केंद्रसरकार व राज्य सरकार यांच्या विविध विभागाचे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्देमाल नष्ट केली जातात...

Post a Comment

Previous Post Next Post