महाराष्ट्र वेदभुमी

श्री कमलेश्वर शिवमंदिर पुगांव येथे महाशिवरात्री उत्सव.


पुगाव खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र पुगाव येथे बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री कमलेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सवा, धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे...

  शिवशंभो श्री कमलेश्वर पिंडीवर दुग्ध जलाभिषेक, दुपारी शिवलीलामृत ग्रंथाचे पठण व वाचन, करून  शिवपालखी सोहळा संपूर्ण हरिपाठ महिलामंडळ-पुगाव यांचे होणार आहे...तसेच ह.भ.प.श्री.नंदकिशोर बामुगडे महाराज- मु. सणसवाडी यांचे सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार आहे..दरम्यान महाप्रसादाचा भाविक भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ व महिला,तसेच युवक मंडळ पुगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post