अलिबाग (सचिन पाटील)
मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे... त्यासोबतच वसईमध्ये मोठे मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे... राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे...
केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी तीन महत्वाचे निर्णय घेत मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे...या प्रकल्पांमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर, मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल यासह मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील...
मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे... दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात... पण अलीकडच्या काळात लोकलमधील गर्दी वाढत चालली आहे... गर्दी वाढल्यामुळं प्रवाशांना लोकलमध्ये चढायलादेखील मिळत नाही... तर, कित्येकदा प्रवाशांना दरवाज लटकतच प्रवास करावा लागतो... या सगळ्या समस्येवर सरकार लवकरच तोडगा काढला आहे... त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे...
