महाराष्ट्र वेदभुमी

खांदाड राजीप शाळेची बाल आनंद मेळावात सुयश.

 


माणगांव :- (नरेश पाटील) : माणगाव नगरपंचायत  हद्दीतील  रा.जि.प  शाळा खांदाड  येथे  आयोजित  केलेल्या केंद्रस्तरीय  क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक  कार्यक्रमाचे उद्घाटन  रा.जि.प. माजी शिक्षण व आरोग्य  समिती सभापती मा.श्री. ज्ञानदेवजी पवार व माणगाव पंचायत  समितीच्या गटशिक्षणाधिकारी मा. सुरेखा तांबट मॅडम यांच्या हस्ते झाले... सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर  समूहगीत गायन स्पर्धेत  रा.जि.प  शाळा खांदाडचा  प्रथम  क्रमांक आला... तसेच  पारंपारिक नृत्य स्पर्धेत शेतकरी नृत्यात  तृतीय क्रमांक  मिळवून  खांदाड  आदर्श  शाळेची मान विद्यार्थ्यांनी उंचावली आहे... इतर स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी आपले कलागुण  दाखवून  दिले... सहभागी सर्व  विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी मा. तांबट मॅडम, केंद्रप्रमुख  शिंदे सर , खांदाड  गावातील उपस्थित मा.श्री ज्ञानदेवजी पवारसाहेब  नगरसेवक श्री .काशिरामदादा पोवार ,पोलीस  पाटील श्री.नथुराम  पोवार, संतोष मांजरे, शाळा समिती अध्यक्ष, सर्व सदस्य  या सर्वांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे  अभिनंदन  व कौतुक  केले...

Post a Comment

Previous Post Next Post