माणगाव :- (नरेश पाटील) विधान सभा निवडणुकी करीता १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघातील येणारे पाच तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माणगाव काँग्रेस कार्यालयात रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी एकत्र येत एकमुखाने ठराव संमत केला... काँग्रेस पक्ष उमेदवारी अर्ज भरून उभे करण्याचा ठराव पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता तसेच हित चिंतक अशा सर्वाच्या उपस्थितीत घेण्यात आला...यावेळी श्रीवर्धन ता.काँग्रेस पक्ष अध्यक्ष माननिय सादिख राऊत, म्हसळा ता.अध्यक्ष डॉ.मोयिझ शेख, माणगाव ता.अध्यक्ष विलास सुर्वे, तळा ता. अध्यक्ष शरद भोसले आणि रोहा तालुक्यातील काँग्रेस पक्ष अध्यक्ष सुनिल देशमुख, रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे लोकप्रीय नेते तथा श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाकरीता संभव्य उमेदवार राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ, जिल्हा सचिव डॉ. नरेंद्र सिंह तसेच पक्षांचे नगरसेवक, शहराचे अध्यक्ष उपस्थित होते...
दरम्यान विलास सुर्वे यांनी सर्वांचे स्वागत केले...तसेच राजाभाऊ यांचें स्वागत शाल व पुष्प गुच्छ सदिख राऊत यांनी केले... यानंतर डॉ. मोयीज शेख, सादिख राऊत, शरद भोसले तसेच काही पदाधिकारी यानी भाषण केले... रायगड जिल्ह्यातील अलिबागचे माजी काँग्रेस आ. स्वर्गीय मधूकर ठाकुर यांचे चिरंजीव राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ यानी १९३ श्रीवर्धन विधान सभा निवडणुकीत उतरावे म्हणून सर्वांनी एकच सुर लावून आपला पाठिंबा जाहिर केला... दरम्यानचा काळात इथे एक अतिशय नोंद घेण्याची बाब म्हणजे नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३२ रायगड लोकसभा मतदार संघात प्रदेश काँग्रेस कमिटीने श्री. राजेंद्र ठाकुर उर्फ राजाभाऊ यांना काँग्रेस आय पक्षाचे इंडिया आघाडीची दुत म्हणुन आणि लोकसभेची उमेदवार आनंत गीते यांचे निवडणुकी काळात मोठी जबाबदारी देण्यात आल्याने राजाभाऊ ठाकुर यांचे विशेष कौतुक करून श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात त्यांचे दांडगा संपर्क राहिल्याने १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाचे अंतर्गत येणारे पाच तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा तालुक्यातील बरेच भाग आहेत आणि हीच श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकरीता निश्चितच जमेची बाजु असल्याने सदर मतदार संघ हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहे... आतापर्यंत झालेल्या एकूण १४ निवडणुकीपैकी काँग्रेस आय पक्षांनी दहा वेळा बाजी मारलीय... हा मतदार संघ कोकणाचे भाग्यविधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे काँग्रेस पक्षाचे स्वर्गीय बॅरिस्टर ए आर.अंतुले यांचे जन्म स्थळ व मतदार संघ आहे... राजाभाऊ ठाकुर यांनी आपला भाषण दरम्यान उपस्थित सर्वांचे प्रथम स्वागत करून सांगितले कि आजची सभा विलास सुर्वे यांनी बोलविले याकरीता त्यांचे अभिनंदन केले.. सर्वांनी १९३ श्रीवर्धन निवडणुकी करीता जो आग्रह धरला तसेच माझे दिवांगत वडील स्वर्गीय मधूकर ठाकुर यांनी केलेल्या कामांची प्रशंसा केली त्यासाठी मी भारावून गेलो तसेच सर्वांचा मान, पक्षाचे आदेश मान्य करून १९३ विधान सभा निवडणुकीचा रिंगणात मी नक्कीच उतरेन असा विश्वास दिला.. दरम्यान सर्वांनीच आनंद व्यक्त करत घोषणा दिल्या तसेच बॅरिस्टर अंतुले यांचा जयघोष केला.... प्रदेश काँग्रेस पक्ष यानी राजाभाऊ ठाकुर यांना AB फॉर्म देवून उमेदवारी दिली पाहिजे अशा घोषणा दिल्या...
