महाराष्ट्र वेदभुमी

प्रीतम म्हात्रे यांचा भाजपला थेट इशारा..!!

 


पनवेल जितिन शेट्टी : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे चित्र म्हात्रे यांना मतदारसंघात मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसत आहे... रविवारी पळस्पे गावामध्ये प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली असता मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी हजर होता...

उरण विधानसभा मतदारसंघातून प्रीतम म्हात्रे हेच पुढचे आमदार असावेत, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा प्रत्यय प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी जमा होणाऱ्या गर्दीवरून दिसत आहे...उरण विधानसभा मतदारसंघातून काही झाले तरी आपण निवडणूक लढवणार असून येत्या काळात  भारतीय जनता पक्षामधून शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचे संकेत प्रीतम म्हात्रे यांनी पळस्पेमध्ये बोलताना दिले...

 भाजपला खाली करू..!!

निवडणुकीसाठी फॉर्म भरणारच आहोत. ज्या दिवशी आपण फॉर्म भरू, त्या दिवसापासून पुढच्या तीन दिवसांत ३० टक्के बीजेपी खाली करू हे उद्गार काढताच टाळ्या आणि शिट्यांनी प्रीतम म्हात्रे यांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला...

Post a Comment

Previous Post Next Post