माणगाव :- (नरेश पाटील)
कोकण पदवीधर मतदार संघ काँग्रेस पक्ष उमेदवार रमेश कीर
बुधूवारी दि.२६ जून २०२४ रोजी कोकण पदवीधर मतदार संघ करीता निवडणूक पार पडली आहे... सदर निवडणूक रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातही यशस्वी रीतीने पार पडली या निवडणूकीत कोकण पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अन् इंडिया आघाडीचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश श्रीधर कीर निवडणुकी करीता उभे होते... त्यांच्या विजयाकरीता इंडिया आघाडीचे माणगाव तालुक्यातील राष्ट्रिय काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह इतर अनेकमित्र पक्षाचे पदाधिकारी यांनी बूथ लेव्हल येथे आवर्जून संपूर्ण दिवस उपस्थिती दर्शवून निवडणुकीच्या दिवशी आलेले मतदार यांना मतदान स्लीप मार्गदर्शन करताना दिसत होते...
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सचिव डॉ. नरेंद्र सिंग,शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माणगाव तालुका अध्यक्ष गजानन अधिकारी, काँग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष विलास सुर्वे, नगरसेवक अजित तारलेकर माणगाव शहर अधिकारी युवा सेना कार्यकर्ते अजिकेश जाधव, शाखा अधिकारी ऋषिकेश विलास मोरे, उपशाखा अधिकारी अथर्व हाटे, इब्राहिम करेल, दिपराज साळवी सह आधी उपस्थित होते...
दरम्यान विलास सुर्वे ,यांनी वार्तालाप करताना सांगितले की आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की, मतदार यानी इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना भरघोस मतदानी निवडून आणतील याबद्दलचा आपला विश्वास व्यक्त केला... दरम्यान दु. ३ च्या नंतर मतदान केंद्र येते लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या...
यावेळी एका मतदार यानी आपला भावना व्यक्त करताना सांगितले की,मतदान करण्यासाठी या ठिकाणी एकीकडे रांगेत गर्दी झाल्याने तसेच संत गतीने मतदान होत असल्याने तीव्र नापसंत व्यक्त करीत आणखीन एक केंद्र उभी करण्याचे मत व्यक्त केले... दरम्यान पार पडलेल्या या पदवीधर निवडणूकीत माणगाव तहसील कार्यालयात मतदान केंद्र क्रमांक ६८ येथे ७८.०९९ टक्के तर ६८- अ मधील येथे ६४.४९ टक्के तर गोरेगाव मतदान केंद्र क्र.६९ येथे ६८.६६ टक्के एकंदरीत मतदान झाल्याचे महिती हाती लागली आहे...
