महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी आपला वाढदिवस परहूर येथील वृद्धाश्रमात केला साजरा



अलिबाग:अब्दुल सोगावकर

सोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवार दि. ३० मार्च रोजी आपला ४३ वा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने व सामाजिक भान ठेवून परहूर येथील श्री समर्थ वृद्धाश्रम येथे वृद्धांचे आशिर्वाद घेत केक कापून साजरा केला...


     यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक जयेंद्र गुंजाळ यांना  सचिन घाडी यांनी आर्थिक मदतीचे धनादेश दिला, वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करताना सचिन घाडी यांच्यासोबत त्यांच्या घरातील सर्व सदस्य, सचिन घाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते...

          सामाजिक कार्यात नेहमीच सक्रीय सहभाग घेणारे सचिन घाडी यांना त्यांच्या चाहत्यांनी व मित्रपरिवारांनी पहाटेपासूनच सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला, तर दिवसभरात अनेकांनी फोन करून तर प्रत्यक्ष निवासस्थानी भेट देऊन निरोगी व आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या, यामध्ये रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, ज्येष्ठ गुरुवर्य चांदोरकर सर, सातीर्जे माजी उपसरपंच उमेश ठाकूर, संजय शिंदे, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, विवेक जोशी, चंद्रकांत खोत, विजय घरत, राजेंद्र घरत, सूचित थळे, संतोष बांद्रे, शैलेश तिर्लोटकर सर, ए.बी.के ग्रुप मूनवली, महिला बचत गटाच्या सोगाव व मूनवली येथील महिला, सचिन घाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते व इतर मूनवली पंचक्रोशीतील मंडळाचे कार्यकर्ते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

फोटो लाईन : मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आपला वाढदिवस कुटुंबियांसह परहूर वृद्धाश्रमात साजरा करताना

Post a Comment

Previous Post Next Post