शहानवाज मुकादम/रोहा
रोहा आगाराकडून वार्षिक परीक्षेची गांभीर्यपूर्वक दखल घेउन बस सेवा नियमीत व सुरलीत सुरु ठेवण्याची मागणी- माता पालक
दि:०१ एप्रिल २०२४ रोहा:तालुक्यातील चोरढे येथून सकाळी ७ वाजता सुटणारी एसटी न आल्यामुळे शाळकरी मुलांची गैरसोय...रोहा आगाराकडून वार्षिक परीक्षेची गांभीर्यपूर्वक दखल घेउन बस सेवा नियमीत व सुरळीत सुरु ठेवण्याची मागणी माता पालकवर्गाकडुन होत आहे..
दिनांक ३०/०३/२०२४ रोजी रोहे येथून चोरढे एसटी आली नाही,.तसेच काकळघर - रोहा ही बस चोरढे येथे ७:३५ च्या दरम्यान येणारी बस पंक्चर झाली असल्याने चणेरे रोहा शाळेत वार्षिक परीक्षासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी गाडीने जादा पैसे देऊन जावे लागले... तसेच आज दि: ०१/०४/२०२४ रोजी सदरची चोरढे एसटी आलीच नाही. काकलघर रोहा गाडी मध्ये चोरढे तळेेखार येथील जवळपास शाळेंचे मुलांना घेतले, ह्या गाडीत किमान ८०/८५ प्रवासी झाल्यानंतर पारंगखार, कोकबण, दिवफाटा व सारसोली येथील शाळकरी मुलांना सदर गाडीत घेतले नाही सध्या वार्षिक परीक्षाचे हंगाम सुरु असल्यामुळे मुलांच्या भविष्याकडे दुर्लक्ष होत असून शाळकरी मुलांवर मानसिक ताण पडत आहे...
चोरढे एस.टी(बस सेवा) अनियमित येत असते त्याबाबत वारंवार तक्रार करून देखील रोहा आगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहेत...
शाळेच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत वेळेस जाता येत नसल्याने ग्रामस्थांकडून व पालकांकडून एसटी आगार व्यवस्थापक यांच्यावर नाराजी व्यक्त केली...
तसेच समाज सेवक व शिक्षण प्रेमी अन्वर हलडे यांनी ही गोरगरिब शाळेच्या विद्यार्थ्यांकडून जादा खर्च करीत खाजगी वाहनाचा वापर करून देखील शाळेत वेळेस जाता येत नाही..
तसेच गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडून ही रोहा आगार व्यवस्थापक यांना सुचना देण्यास विनंती करणार असल्याचे म्हणाले...
तसेच रोहा आगार व्यवस्थापक यांच्याकडून शाळेच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षेची गांभीर्यपूर्वक दखल घेउन चोरढे ते चणेरे या विभागात सदरची बस सेवा नियमीत व सुरळीत सुरु ठेवण्याची मागणी माता पालक वर्गाकडून होत आहे...

