रोहा प्रतिनिधी: नंदेश गायकर
एप्रिल महिन्यात प्रत्येक माणसाला एकच ओढ लागते ती म्हणजे कार्ल्याच्या एकविरा आईच्या भेटीची..असाच एक पदयात्री मंडळ धनगर आळी आज गेली १५ वर्ष आईच्या भेटीसाठी भावपूर्ण भक्तीने पायी चालत वारी करत आहे...
रोहा तालुक्याची शान धनगर आळी पदयात्री मंडळ रोहा यांचा आईचा मानाचा भंडारा कार्यक्रम बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी पार पडला....मनोभावे आईवर श्रध्दा ठेवून न थकता अखंड आई पालखीची वारी करणारा मंडळ त्याचे सदस्य,अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचे नियोजन पूर्ण.कार्य अतिशय उल्लेखनीय आहे... पदयात्री येणा-या नवीन माणसाला माया देवून त्याची योग्य ती जबाबदारी सांभाळत कार्य करणारे मंडळ अशी या मंडळाची ख्याती आहे...
त्यांच्या या सहकार्याने आई एकविरेचा हा भंडारा सोहळा संपन्न करण्यात आला...
