विशेष प्रतिनिधी: पनवेल
एकविरा कला संस्था पनवेल रायगड आणि श्री.बी.के.पाटील फाउंडेशन (केळवणे पनवेल) या संस्थेच्या मार्फत ठाणे,पालघर, रायगड,नवी मुंबई आणि मुंबई या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा 'भूमीकन्या सन्मान' २०२४ ने सन्मान करण्यात येणार आहे...
समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, पत्रकार, डॉक्टर, वकील, पोलीस , सैनिक पत्नी मेकअप आर्टिस्ट, मॉडलिंग, बचत गट, लघुउद्योग, कलाक्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष सत्कार देऊन गौरविण्यात येणार आहे..
सदर कार्यक्रम रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ वेळ सायंकाळी साडेतीन वाजता गोखले हॉल महानगरपालिकेजवळ पनवेल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गायक, दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला संस्था पनवेल तर्फे भूमीकन्या हा पुरस्कार देण्यात येणार आहे..
