महाराष्ट्र वेदभुमी

खांबेरे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाचे उमेदवार आत्माराम कासार यांचीच हवा!




शहानवाज मुकादम/रोहा

सामान्यांकडुन मोठ्या प्रमाणात कासार यांनाच थेट सरपंच उमेदवार म्हणून पसंती...

तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत मधील थेट सरपंच पदाचे उमेदवार श्री आत्माराम कासार यांचीच हवा आसुन सामान्यांकडुन कासार यांनाच पसंती असल्याचे केलेल्या सर्वेक्षणात दिसुन येते...

सरपंच पदाचे उमेदवार श्री कासार यांना ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य पदाचा डांगा अनुभव आसुन ते सतत भ्रष्टाचारा विरुधात अवाज बुलंद करीत असल्याने विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणलेआहेत...

 राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक समजली जाते, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडा सुरू आहे...

 थेट सरपंच पदाचे उमेदवार जनतेतून निवडून जाणार असल्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे...

 दि:०५ नोव्हेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतून गावपातळीवरून अमदार,खासदार, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची समीकरणे तयार होत असल्याने आपलाच सरपंच राहावा, या उद्देशाने ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांमार्फत ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी नेते मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यावर लक्ष ठेवून आहेत,

 मात्र खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील गावो गावी व वाड्यांवर थेट सरपंच पदाचे उमेदवार म्हणून अतमाराम कासार यांनाच मोठ्या प्रमाणावर पसंती आसुन केलेल्या सर्वेक्षणात कासार यांचीच हवा आसल्याची दिसुन येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post