उरण दि ३ प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)
वहाळगावचे पंचायत समिती माजी सभापती विश्वनाथ शेठ पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र
अविनाश विश्वनाथ पाटील एक समाजातील चांगल व्यक्तिमत्व असून ते गेली ३२ वर्षे माझगाव डॉक कंपनीत वरिष्ठ भांडारपाल म्हणून सेवा केली.३१ ऑक्टोबर २०२३ तारखेला ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले... वहाळगावचे पंचायत समिती माजी सभापती विश्वनाथ शेठ पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत...अविनाश विश्वनाथ पाटील हे सेवानिवृत्त झाले पण त्यांचं कार्य फार चांगलं असल्यामुळे सतत लोकांना मदतीचा हात असतो...त्यांच्या सौभाग्यवती वंदना अविनाश पाटील या सुद्धा पनवेल पंचायत समितीच्या सभापती होऊन गेल्या पण सत्तेचा कधी माज केला नाही...या शब्दात वहाळ साई मंदिरचे अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी अविनाश पाटील यांच्या बाबत गौरवोदगार काढले...गोरगरिबांना सतत मदत करणारे अविनाश पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री साई देवस्थान साईनगर वहाळ येथे त्यांचा देवस्थान तर्फे साई सन्मान पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. ..त्यांना समाजातील अनेक लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला...पुढील उर्वरित जीवन तुमचं निरोगी राहावो, सुखी समृद्धी जीवन लाभो अशी रवीशेठ पाटील यांनी साईचरणी प्रार्थना केली...
संस्थेचे ट्रस्टी मो. का.मढवी गुरुजी यांच्या हस्ते अविनाश पाटील यांना सन्मानित
संस्थेचे ट्रस्टी मो. का.मढवी गुरुजी यांच्या हस्ते अविनाश पाटील यांना शाल, श्रीफळ,गुलाबपुष्प,सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे ट्रस्टी बाळाराम कृष्णा पाटील, राजू मुंबईकर, कलासागरचे श्रीकांत मुंबईकर,विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रविंद्र विश्वनाथ पाटील,जगदीश कृष्णा पारंगे,जगन.का. पाटील, अनंत पाटील ,विश्वास पाटील, एकनाथ ठाकूर, मंजीत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कलासागर निर्मित स्वर तरंग संगीत मैफिल कार्यक्रमातून गायक -नरेश गुल्लू, ज्ञानेश्वर अजलापूरकर, गायिका -दया बाबरे, अरुणा हेगडे, वादक -रमेश वास्कर, सुभाष वास्कर, विशाल वाघमारे, निशांत भालेराव यांनी भाव गीत, भक्ती गीत प्रदर्शीत करून रसिक प्रेषकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन निवेदक जीवन डाकी यांनी केले...
