महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हा सामान्य रुग्णालयात फायर पे एफ.आय.आर

 

अलिबाग :विशेष प्रतिनिधी 

डॉ.मानेंच्या कारकीर्दीत गाइडलाइन्सला धाब्यावर मारून बसविली गेली निकृष्ठ दर्जाची अग्निसुरक्षित यंत्रणा 

सार्वजनिक रुग्णालयात आगी लागण्याच्या घटना समोर आल्या असून याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अग्निसुरक्षिततेसंदर्भात नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या होत्या सरकारने असे ही म्हटले की, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा यामध्ये करण्यात आल्यास त्यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाला जबाबदार ठरवले जाईल...परंतु त्या गाइडलाइन्सला धाब्यावर मारून माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या कारकीर्दीत निकृष्ठ दर्जाचे अग्निसुरक्षित यंत्रणे बसवण्यात आल्याचे दिसून आले..


कर्मचाऱ्यांना यंत्रणा वापर करण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही

यापूर्वी देखील अनेकांचे जीव डॉ. सुहास माने यांनी वेठीस धरून जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम रखडवले होते... मानेंनकडून काम करत असल्याचा आव आणतानाचे दाखवून जिल्हा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षित यंत्रणेची बिले काडून यंत्रणे मात्र इतक्या निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आली आहेत; की वर्षभरात त्या यंत्रणांना गंज देखील लागला आहे... अग्निसुरक्षित यंत्रणाची कोणत्याही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले नसून कर्मचाऱ्यांना त्या यंत्रणांचा वापर कसा करावा याची देखील माहिती नाही...

बांधकाम व इतर कर्मचाऱ्यांची मंत्रालयीन चौकशीची मागणी डॉ.सुहास मानेंवर करणार गुन्हा दाखल -अजित पाटील 

सरकारच्या गाइडलाइन्सनुसार स्थानिक अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत अग्निसुरक्षिततेसंदर्भात प्रत्येक तीन महिन्यांनी मॉक ड्रिल आयोजित करावे असे सांगण्यात आले असून यातली कोणत्याही प्रकारची काळजी जिल्हा रुग्णालयातून घेतली जात नसून सामान्य जनतेचा जीव वेटीस धरलेला असल्याची बाब लक्षात घेवून रुग्ण कल्याण समिती सदस्य रायगड जिल्हाचे अजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम व इतर कर्मचाऱ्यांवर मंत्रालयीन चौकशी करण्याची मागणी केली असुन माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्यावर गुन्हा दाखल करणार असे अजित पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post