महाराष्ट्र वेदभुमी

अवैध वृक्षतोड प्रकरणी संबंधित खैर माफिया विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी!


जप्त केलेला खैराचा माल व वृक्षतोडीचे ठिकाणा बाबत वनपाल व जमीन मालक यांच्याकडील माहितीत तफावत खैर माफिया मात्र मोकाट...

रोहा / शहानवाज मुकादम 

(२१ ऑक्टोबर) तालुक्यातील चणेरा विभागात खैर तस्करी कामी वृक्षतोड झाले बाबत वनविभागाला माहिती मिळताच खैराचे माल जप्त करण्यात आले आसुन कारवाई गुलदस्त्यात आणी खैर माफिया मोकाट..

वनपाल श्री गायकवाड यांना फोनवरून संपर्क साधला आसता खैराची तोड श्री भालचंद्र पाटील यांच्या जागेत झाली आसुन सदर चा माल जप्त करण्यात आला आहे, दंडाची कारवाई करण्यात येईल आसे चणेरा वनपाल म्हणाले.

 श्री पाटील यांना विचारणा केली आस्ता त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ७ कि. मी. अंतरावर खांबेरे हद्दीत गट नंबर ९६ ह्या जमिनीतील खैरा च्या झाडांची कत्तल करून माल चोरीस गेला आसुन या बाबतीत मला व संजय गोरीवले यांना रोहा पोलीसांकडून बोलवणा झाल्यावर ही बाब लक्षात आली आहे.


वनविभागाकडुन जप्त करण्यात आलेला माल हा मझ्या जागेत मिळाला नसुन चणेरा वनपाल याच्याकडून माझ्यावरच दंडाची कारवाई करण्यात येणार आसलयाचे ते महणाले.

 वनपाल श्री गायकवाड आणी जमीन मालक श्री भालचंद्र पाटील यांच्या म्हणण्यात तफावत दिसून येत आहे.

 वनविभागाकडुन खैर तस्करी कामी  वृक्षतोड विरुद्ध ची कारवाई प्रामाणिकपणे न झाल्याने खरे वृक्षतोड व खैर माफिया मोकाट. 

 सदर विषयात उपवनसंरक्षक रोहा व वनक्षेत्रपाल मुरुड यांनी विशेष लक्ष घालून खैर माफिया कोण?

जमीन मालक व संजय गोरिवले यांचा खैर माफियांशी संबंध काय?

वनपाल श्री गायकवाड आणी जमीन मालक यांच्याकडून मिळालेली माहितीत तफावत का?

या बाबत ज्यांचा ज्यांचा या वृक्षतोडीत सहभाग आहे त्यांच्या विरुद्ध चौकशीअंत गुन्हा दाखल करण्या ची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post