कोलाड (श्याम लोखंडे)
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त धाटाव हायस्कुलमध्ये मनुष्य गौरव दिन
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त धाटाव हायस्कुलमध्ये मनुष्य गौरव दिन साजरा करण्यात आला...रोहा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या हस्ते आदरणीय दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले...औद्योगिक विद्यालय धाटाव या शाळेचे नाव परम पुजनीय पांडुरंगशास्त्री आठवले औद्योगिक विद्यालय धाटाव असे या शाळेचे नामांतरण आहे... शाळेचे सहाय्यक शिक्षक हनुमंत चव्हाण यांनी पांडुरंगशास्त्री आठवले दादा यांचा जीवनपरिचय विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितला...गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या... धाटाव औद्योगिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सरांनी पाहुण्यांचे आभार मानले...
गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे,धाटाव औद्योगिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे,धाटाव औद्योगिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस.पाटील,राईट टू एज्युकेशन समन्वयक जयश्री भांड, एम. बी. मोरे फाउंडेशनच्या मुख्याध्यापिका नंदिनी जोशी,सहाय्यक शिक्षक हनुमंत चव्हाण,सुशीला चव्हाण,लता मोरे,सुनील पगारे,रविंद्र कान्हेकर,तनुजा खाडे,रोहन अहिवळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
