कोलाड (श्याम लोखंडे)
पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण सर्वत्र संताप व्यक्त
मुंबई गोवा महामार्गावरअसलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावर गेली चार ते पाच दिवसापासुन पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेत लचके काढल्याची घटना घडली असल्याने येथील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले असुन सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे...
चार ते पाच दिवसापासुन पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने सात ते आठ जणांना चावा घेत लचके काढलेची घटना
गेली कित्येक दिवस कोलाड आंबेवाडी नाक्यावर तसेच विविध ठिकठिकाणी या भटक्या कुत्र्यांचे समूह आढळुन येत आहेत तर रात्रीच्या सुमारास तर अक्षरशः या भटकंती कुत्र्यांमुळे वाहन चालकांना हि धोका निर्माण होत आहे तर मर्गावर भर रस्त्यात नागरिकांच्या अंगावर धावून येतात अनेकदा याबाबत संबधीत खात्याकडून यावर उपाय योजना करण्यात याव्या अशी वृतपत्रात बातमीच्या माध्यमातुन नागरिकांनी मागणी केली...माञ याला केराची टोपली दाखवली असल्याने आज चक्क या भटक्या कुत्र्यांनी येथिल नागरिकांवर हल्ला चढवत तब्बल सात ते आठ जणांना चावा काढला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे...
रेबीज झालेल्या कुत्र्याला पकडण्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला यश...कुत्राचाही झाला मृत्यू
तसेच त्या पिसाळलेल्या कुत्र्याला रेबीज रोग झाल्याचे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेकडून सांगण्यात आले...शेवटी रेबीज झालेल्या कुत्र्याला पकडण्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला यश आले व लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असुन रेबीज झालेल्या कुत्र्याला कोणत्याही प्रकारचा उपचार होत नाही मग तो मनुष्य असो किंवा कुत्रा,त्या पकडलेल्या कुत्राचे ही मृत्यू झाला..जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतर वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये फार कमी प्रमाणात जनजागृती आहे...यामुळे जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले असुन जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यु एकट्या भारतात नोंदविण्यात येतात...सामान्यांना या आजाराबद्दल फार माहिती नाही त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ञाणकडून जाणून घेण्याचे प्रयत्न करावे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर दहिंबेकर,उपाध्यक्ष निलेश लोखंडे,सदस्य अखिलेश यादव,संदेश यादव यांच्याकडून सांगण्यात आले...
