महाराष्ट्र वेदभुमी

अलिबागच्या स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचातर्फे जेष्ठ नागरिकांचा सन्मान..




अलिबाग, (प्रतिनिधी) : 

अलिबाग येथील राम-नारायण पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात जेष्ठांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते 

स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कलामंचातर्फे सेवानिवृत्त पोलिस उपनिरिक्षक शंकरराव टके, टाऊन प्लॅनिंग खात्याचे माजी अधिकारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल राऊत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी कर्मचारी, तसेच अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा चारुशिला कोरडे या तीन जेष्ठांचा सन्मान शनिवार दि.७/१०/२०२३ रोजी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग येथील राम-नारायण पत्रकार भवनात आयोजित  कार्यक्रमात जेष्ठांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला...

याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष,सल्लागार,कार्यवाह,आदी उपस्थित

याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, मंचाचे सल्लागार गजेंद्र दळी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी,कोमसापचे सहकार्यवाह नंदू तळकर, श्रींरंग घरत, शरद कोरडे, ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, माजी नगरसेवक आर.के. घरत,सार्वजनिक वाचनालय अलिबाग आणि जिल्हा ग्रंथालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे,मंचाचे सल्लागार श्रीरंग घरत,माजी नगरसेवक आर.के.घरत, (दै.प्रहार) यांची उपस्थिती लाभली..

Post a Comment

Previous Post Next Post