महाराष्ट्र वेदभुमी

खांबेरे विभागातील वृक्षतोड प्रकरणी खैर माफियावरील कारवाई गुलदस्त्यातच!



रोहा - चणेरा ०८ऑक्टो प्रतिनिधी:(शहानवाज मुकादम)

जप्त केलेल्या खैराच्या मालाचे ठिकाण व वृक्षतोडीचे ठिकाण दोन्ही जमिनीचे गटनंबर वेगवेगळे..खैर माफिया मात्र मोकाट...

रोहा तालुक्यातील चणेरा विभागात खैर तस्करी कामी वृक्षतोड झाल्याबाबत वनविभागाला माहिती मिळताच तीन तासात खैराचे माल जप्त करण्यात आले होते...जप्त केलेल्या खैराच्या मालाचे ठिकाण व वृक्षतोडीचे ठिकाण हे दोन वेगवेगळे जमिनीचे गट दिसत आहे...



वनपालांनी जप्त केलेला खैर व वृक्षतोड ठिकाणामध्ये वनपाल गायकवाड व जमीनमालकाच्या म्हणण्यात तफावत 

वनपाल श्री गायकवाड यांनी फोनवरून दिलेल्या माहितीनुसार वृक्षतोड आणि खैराचा जप्त केलेल्या मालाचे ठिकाण हा गट नंबर एकच आहे...वनपाल यांच्या सांगण्यावरून सदर जमीनीचे मालक यांना विचारले असता सदरचे वृक्षतोड माझ्याच जागेत अनाधिकृत तोड करुन खैराचा माल चोरीला गेला असुन संबंधित वन विभागाकडून माझ्यावरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले...वनपाल यांनी जप्त केलेला खैर आणि वृक्षतोडीचे ठिकाण याबाबत वनपाल श्री गायकवाड आणि जमीन मालक यांच्या म्हणण्यात तफावत दिसून येत आहे...

वनविभागाकडुन खैर तस्करी कामी केलेली वृक्षतोड विरुद्धची कारवाई गुलदस्त्यातच....

वनविभागाकडून काय कारवाई करण्यात आल्याची चर्चा चणेराविभागातील वृक्षप्रेमीनकडुन चहुबाजुने होत आहे...मुरुड वनक्षेत्रपाल व उपवनसंरक्षक रोहा यांनी खैर तस्करी कामी वृक्षतोड केल्याबाबत दखल घेउन कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे...

तसेच सदर विषयात उपवनसंरक्षक रोहा यांनी विशेष लक्ष देऊन खैर माफिया व ज्यांचा ज्यांचा या वृक्षतोडीत सहभाग आहे... त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची मागणी रोहा पत्रकार संघटना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने करण्यात येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post